Advertisement

यंदाही आघाडीत मनसे नाही?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्न करायचे की स्वबळावर निवडणूक लढवायची हा मनसेपुढील प्रश्न कायम आहे.

यंदाही आघाडीत मनसे नाही?
SHARES

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा फाॅर्म्युला नक्की झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागांवर लढणार असून मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येणार आहे. मात्र या मित्रपक्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घ्यायचं की नाही यावर मात्र दोन्ही पक्षाचं एकमत होऊ शकलेलं नाही.   

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्न करायचे की स्वबळावर निवडणूक लढवायची हा मनसेपुढील प्रश्न कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढताच मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यावेळेस काँग्रेसने प्रामुख्याने मनसेला सोबत घेण्यास नकार दिला होता. तसंच यंदा विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही.  

तर, दुसऱ्या बाजूला आघाडी संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची त्यांची भूमिका आहे. पण त्यांची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे मनसेबाबत अजूनही संभ्रमाची स्थिती असल्याचं दिसत आहे. 



हेही वाचा-

काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर ‘अशी’ केली मात

२८८ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार- आंबेडकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा