Advertisement

काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर ‘अशी’ केली मात

दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवणार असून मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर ‘अशी’ केली मात
SHARES

सत्ताधारी भाजप-शिवसेनेत जागावाटपावर अजूनही चर्चा सुरू असताना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवणार असून मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं. 

दोन्ही नेत्यांचं एकमन

पक्षांतराचा धक्का बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार निम्म्या-निम्म्या जागा लढण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं एकमत झाल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. 

निम्म्या निम्म्या जागा

तर नाशिकमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी निम्म्या-निम्म्या जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं सांगितलं. ५ ते ७ जागांची अदलाबदल करण्यात येणार असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीला ६ जागा

मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांपैकी राष्ट्रवादी अणुशक्ती नगर, कुर्ला, वरळी, दिंडोशी, मागाठणे, विक्रोळी अशा ६ जागांवर लढणार आहे. दिंडोशीची जागा आधी काँग्रेसकडे होती. ती राष्ट्रवादीने घेतली असून त्या ऐवजी गोरेगावची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.


हेही वाचा-

२८८ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार- आंबेडकर

काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा