Advertisement

विधानसभा निवडणूक २०१९: मुंबईत काँग्रेस २९, तर राष्ट्रवादी ७ जागा लढवणार

एका बाजूला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपाची खेचाखेच सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचा फाॅर्म्युला मात्र टप्प्या टप्प्याने पुढं सरकत आहे.

विधानसभा निवडणूक २०१९:  मुंबईत काँग्रेस २९, तर राष्ट्रवादी ७ जागा लढवणार
SHARES

एका बाजूला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपाची खेचाखेच सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचा फाॅर्म्युला मात्र टप्प्या टप्प्याने पुढं सरकत आहे. आघाडीच्या जागा वाटपानुसार मुंबईमध्ये काँग्रेस २९ जागांवर लढणार असून ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी या संदर्भात सांगितलं की, मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागांपैकी २९ जागांवर काँग्रेस, तर ७ जागांवर राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार आहेत. जागा वाटपाच्या बाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सकारात्मक पातळीवर चर्चा सुरू असून कुठल्याही जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद नाहीत. 

हेही वाचा- तयारी राज्यरोहणाची!

‘या’ जागा ठरल्या

राष्ट्रवादी कुठल्या जागांवर उमेदवार उभे करणार या प्रश्नाचं उत्तर देताना मलिक म्हणाले, राष्ट्रवादी मुंबईतील अणुशक्ती नगर, वरळी, कुर्ला आणि विक्रोळी या ४ जागा लढवणार असल्याचं नक्की झालं आहे. तर उरलेल्या ३ जागा अजून नक्की व्हायच्या आहेत. राष्ट्रवादीने निवडलेल्या चारही जागांवर सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. 

एकही जागा नाही

२०१४ सााली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ मतदारसंघापैकी १४ जागी भाजप, १३ जागी शिवसेना, ६ जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. समाजवादी पार्टी तसंच एमआयएमला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. मुंबईत राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकली नव्हती.   



हेही वाचा-

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती

विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा १२५-१२५ फॉर्म्युला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा