Advertisement

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती

मागील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती
SHARES

मागील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत जुलैमध्ये मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच होतं.

मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष संजय निरूपम यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तक्रार केल्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवरा यांच्या हाती पक्षश्रेष्ठींनी मुंबईचा कारभार सोपवला होता. परंतु लोकसभेत मुंबईतील सर्व जागांवर झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवरा यांनीआपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेला राजीनामा मंजूर होऊन त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर त्यांच्या सोबतीला नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

परंतु मुंबई अध्यक्षपदी कुणाचीही निवड होत नसल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले होते. अखेर अखिल भारतीय काँग्रेस समितीने या पदासाठी गायकवाड यांची निवड केली.  

मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे, ते जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा टोला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला आहे. निरुपम यांच्या ट्वीटमुळे मुंबई काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.


हेही वाचा-

वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार

देवरांच्या राजीनाम्यानंतर उर्मिलाचा ‘लेटर बाॅम्ब’



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा