देवरांच्या राजीनाम्यानंतर उर्मिलाचा ‘लेटर बाॅम्ब’

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनापासून काम न केल्याचा आरोप करणारा ‘लेटर बाॅम्ब’ अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टाकला आहे.

SHARE

एका बाजूला मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आलेला असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनापासून काम न केल्याचा आरोप करणारा ‘लेटर बाॅम्ब’ अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टाकला आहे. या ‘लेटर बाॅम्ब’मुळे मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसतर्फे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी मातोंडकर यांचा पराभव केला. त्यानंतर उर्मिला यांनी १६ मे रोजी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पराभवाची कारणमिमांसा करणारं पत्र लिहिलं. हे पत्र समोर आलं आहे. 

या ९ पानी पत्रात त्यांनी पराभवाचं सर्व खापर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर फोडलं आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांमधील मतभेद, स्थानिक स्तरावर नेतृत्वाची कमी, कमकुवत प्लानिंग आणि कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचाराचं न केलेलं काम यामुळे आपला पराभव झाल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

त्यावर प्रतिक्रिया देताना मातोंडकर जुन पत्र प्रसिद्धी माध्यमांना देऊन राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. हेही वाचा-

राज यांना हाताची साथ? दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट

जर मॅचच फिक्स असेल, तर खेळून काय फायदा?, असं का म्हणाले राज ठाकरे?संबंधित विषय
ताज्या बातम्या