Advertisement

वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार

अखेर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (MIM)मध्ये फूट पडली आहे.

वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार
SHARES

अखेर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (MIM)मध्ये फूट पडली आहे. एमआयएम आता स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

८० जागांची मागणी

विधानसभा निवडणूक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय ‘एमआयएम’ने घेतला होता. सोबतच ‘एमआयएम’ने ८० मतदारसंघाची यादीही पाठवली होती. परंतु आंबेडकर यांनी खा. असदुद्दीन ओवेसी यांना ४ सप्टेंबरला एक एसएमएस पाठवत अवघ्या ८ जागांचा प्रस्ताव ठेवला.

'एमआयएमम'ध्ये नाराजी

या प्रस्तावामुळे 'एमआयएम'मध्ये नाराजी पसरली. पुढच्या दोन दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास 'एमआयएम' महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवेल, असा खुलासा पक्षातील सूत्रांनी दिला होता. गेल्या निवडणुकीत ‘एमआयएम’ २४ जागांवर लढली होती. त्यामुळे फक्त ८ जागांवर निवडणूक लढवणार नाही अशी ‘एमआयएम’ची ठाम भूमिका आहे. तर आंबेडकर देखील याबाबत स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत.

त्यामुळे आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असं म्हणत ‘एमआयएम’ने वेगळं लढवण्याचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित मुस्लिम आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो आहे. 



हेही वाचा-

३१ आॅगस्टपर्यंत काँग्रेसच्या उत्तराची वाट बघू- प्रकाश आंबेडकर

वंचित, एमआएमच्या जागा वाटपावर बैठक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा