वंचित, एमआएमच्या जागा वाटपावर बैठक

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA)ने १४४ जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव मान्य केल्यास किंवा भविष्यात जागावाटपाची बोलणी यशस्वी झाल्यास ‘एमआयएम’ (MIM)समोर अडचणी निर्माण होऊ शकतात.

SHARE

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA)ने १४४ जागा देण्याचा प्रस्ताव  काँग्रेससमोर ठेवला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव मान्य केल्यास किंवा भविष्यात जागावाटपाची बोलणी यशस्वी झाल्यास ‘एमआयएम’ (MIM)समोर अडचणी निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांना  बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. त्यानुसार हैदराबाद इथं दोघांमध्ये २६ आॅगस्ट रोजी बैठक होणार आहे.

८० जागांची मागणी

वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी ३० जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर निर्णय न झाल्यास ३० जुलैला विधानसभेच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करण्याचा इशारा वंचितने दिला आहे.  लोकसभेत ‘एमआयएम'ने एकच जागा लढवली होती. तिथं इम्तियाज जलील निवडून आले होते. यामुळे विधानसभेसाठीही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी घेतला आहे.

त्यानुसार एमआयएम'ने वंचितकडे ८० जागांची मागणी केली आहे. तर औरंगाबाद मध्य विधानसभा जागेसह अन्य काही जागांवर 'वंचित'ने दावा केला आहे. परंतु 'एमआयएम' या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे वंचितने 'एमआयएम'सोबत चर्चा करण्यासाठी एक समिती तयार केली आहे.

बंद लिफाफ्यात काय? 

दरम्यान एमआयएम नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी मंगळवारी ओवेसी यांनी दिलेलं पत्र अॅड. आंबेडकर यांच्याकडे सोपवल्याने जागा वाटपाबाबतची उत्कंठा अधिकच ताणली गेलीय. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीकडे या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा-

राज यांना भावाचा पाठिंबा, काय म्हणाले उद्धव ठाकरे?

ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचनासंबंधित विषय
ताज्या बातम्या