Advertisement

'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना


'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना
SHARES

'कोहिनूर स्क्वेअर' गैरव्यहार प्रकरणी 'ईडी'नं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, २२ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयावर जाणार होते. मात्र, चौकशीवेळी कार्यकर्त्यांनी 'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

शांतता राखण्याचं आवाहन

राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 'माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळं येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. कुणीही 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचं आहे ते योग्य वेळी बोलेनच,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


शांतता मोर्चा रद्द

सत्ताधारी भाजप राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याची मनसैनिकाची भावना असून, त्यांच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'च्या कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला होता. राज्यभरातील मनसैनिकांना 'ईडी'च्या कार्यालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मनसेनं अचानक हा शांतता मोर्चा रद्द केला आहे.हेही वाचा -

खासगी बस अनधिकृतरित्या पार्क केल्यास दंडात्मक कारवाई

दिगंबर आणि माधवनं शिवला दिला सल्लाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा