खासगी बस अनधिकृतरित्या पार्क केल्यास दंडात्मक कारवाई

खासगी बस बेकायदेशीरपणे पार्क केल्यास १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय, दुसऱ्यांदा पुन्हा आढळल्यास बस जप्त केली जाणार आहे. तसंच, १ सप्टेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.

SHARE

मुंबईतील वाहतुकीला शिस्त लागावी आणि अवैध्य पार्किंगवर कारवाई करण्यासाठी महापालिकेनं 'नो पार्किंग'चा निर्णय घेतला. या निर्णयार्तंगत महापालिका 'नो पार्किंग झोन'मध्ये आढळणाऱ्या गाड्यांवर दंडत्मक कारवाई केली जात आहे. अशातच आता, खासगी बस बेकायदेशीरपणे पार्क केल्यास १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय, दुसऱ्यांदा पुन्हा आढळल्यास बस जप्त केली जाणार आहे. तसंच, १ सप्टेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.

माफक दरात पार्किंग

खासगी बसेससाठी महापालिका क्षेत्रात माफक दरात वाहनतळ उपलब्ध आहेत. मात्र, अनेक खासगी बस रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क केल्या जातात. यामुळं चाकरमान्यांसह प्रवाशांचीही मोठी गैस सोय होते असल्यानं या बस पार्किंगवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांच्या सहकार्यानं ही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या कारवाईतून शालेय बस आणि बेस्ट बसला वगळण्यात आलं आहे

गाडीचा लिलाव

नो पार्किंग झोनमध्ये खासगी बसगाड्या आढळल्यास त्यांच्यावर दंडात्म कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, दुसऱ्यांदा आढळल्यास तात्काळ जप्त करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या या बसगाडीचा संबंधित नियम व पद्धतीच्या अनुसार लिलाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: नोंदणी नाही तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्त

राज ठाकरेंच्या 'ईडी'च्या चौकशीवेळी सर्व कार्यकर्ते राहणार उपस्थितसंबंधित विषय
ताज्या बातम्या