Advertisement

राज ठाकरेंच्या 'ईडी'च्या चौकशीवेळी सर्व कार्यकर्ते राहणार उपस्थित

राज ठाकरे यांच्या 'ईडी'च्या चौकशीच्या वेळीमनसेचे सर्व कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयासमोर हजर राहणार आहेत.

राज ठाकरेंच्या 'ईडी'च्या चौकशीवेळी सर्व कार्यकर्ते राहणार उपस्थित
SHARES

'कोहिनूर स्क्वेअर'मधील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी राज यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठत झाली आहे. या बैठकीत मनसेनं 'ईडी'च्या नोटिशीला 'हटके' पद्धतीनं उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, राज ठाकरे यांच्या 'ईडी'च्या चौकशीच्या वेळी मनसेचे सर्व कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयासमोर हजर राहणार आहेत.

दहा वाजताची वेळ 

माहीम इथं असलेल्या मनसेच्या 'राजगड' या मुख्यालयावर ही बैठक झाली. त्यावेळी राज ठाकरे ज्या दिवशी 'ईडी'च्या समोर चौकशीला जातील, त्याच दिवशी राज्यभरातील मनसेचे कार्यकर्तेही 'ईडी'च्या कार्यालयासमोर हजर राहणार असल्याचं ठरलं आहे. कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी कोणतीही जागा किंवा मार्ग ठरलेला नाही. राज यांना साडेअकरा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानं कार्यकर्त्यांना दहा वाजताची वेळ देण्यात आली आहे. त्यावेळी जमेल त्या मार्गानं, जमेल तसे 'ईडी'च्या कार्यालयासमोर यावं, असं निर्णय घेतल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिलं.

साडेसात तास चौकशी 

'कोहिनूर स्क्वेअर'मधील कथित गैरव्यवहाराप्रकरणी 'ईडी'नं राज ठाकरे, उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली आहे. यापैकी उन्मेष जोशी यांची तब्बल साडेसात तास चौकशी करण्यात आली. मंगळवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या नोटीसनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत त्यांनी भाजपविरोधात पोस्टर लावून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे बंद मागे

राज ठाकरे यांच्याविरोधात भाजपचे सरकार 'ईडी'चा वापर करत असल्याच्या निषेधार्थ मनसेनं २२ ऑगस्ट रोजी पुकारलेला ठाणे बंद मागे घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये असं राज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मनसेच्या ठाणे शाखेनं हा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

बीडीडी चाळीतील ५०० रहिवाशांंना एसीबीकडून चौकशीसाठी बोलवलं

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्ग वाहतूककोंडी होण्याची शक्यता कमी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा