Advertisement

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्ग वाहतूककोंडी होण्याची शक्यता कमी

गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतेवेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव महामार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडं पाठवला आहे.

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्ग वाहतूककोंडी होण्याची शक्यता कमी
SHARES

यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. कारण गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतेवेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव महामार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडं पाठवला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत या मार्गावर टप्प्याटप्प्यानं बंदी लागू होणार आहे. त्यामुंळं यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बाप्पा पावणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

प्रस्ताव सरकारकडं सुपुर्द

कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी प्रत्येक वर्षी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली जातेयावर्षीही तसा प्रस्ताव सरकारकडं पाठवण्यात आला आहेज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त असेल असे ट्रकमल्टिएक्सेलट्रेलर यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.

वाहतूक कोंडी

गणेशोत्सवादरम्यान कोकणात मुंबई ते गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात एसटी आणि खासगी गाड्या जात असतात. मात्र, या मार्गावरील खड्डे आणि अवजड वाहनांमुळं वाहतुकीचा वेग मंदावत असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते.

'या' वाहनांना परवानगी

या प्रस्तावातून भाजीपाला, दूध, पेट्रोल, गॅस सिलेंडर यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला वगळण्यात आलं आहे. त्याशिवाय, मुंबई ते गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाशी संबंधित असलेल्या वाहनांनाही या बंदीतून वगळण्यात आलं आहे.

वाहनबंदीचा कालावधी

  • ३० ऑगस्ट मध्यरात्री १२ ते २ सप्टेंबर रात्री ८ पर्यंत
  • ७ सप्टेंबर सकाळी ८ ते ९ सप्टेंबर सकाळी ८ पर्यंत
  • १२ सप्टेंबर सकाळी ८ ते १३ सप्टेंबर रात्री ८ पर्यंत
  • ३ ते ६ सप्टेंबर आणि ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत बंदी. तसंच, रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत परवानगी
  • ३० ऑगस्ट मध्यरात्री १२ ते १३ सप्टेंबर रात्री ८ पर्यंत वाळू, रेती, तत्सम गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांना बंदी



हेही वाचा -

एसी लोकल धावणार सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर?

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी मेळावा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा