Advertisement

एसी लोकल धावणार सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर?

रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव स्थानकांदरम्यान चालवण्याचा विचारात आहे.

एसी लोकल धावणार सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर?
SHARES

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना लवकरच गारेगार प्रवासाची संधी मिळणार आहे. कारण, रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव स्थानकांदरम्यान चालवण्याचा विचारात आहे. मध्य व पश्चिम रेल्वेला समान एसी लोकल गाड्या मिळणार आहेत. यामधील मध्य रेल्वेवर येणारी पहिली लोकल सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत चालवण्याचा विचार केला जात असल्याचं समजतं. सीएसएमटी ते कल्याण आणि ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बरवरही एसी लोकल धावू शकते. परंतु, सीएसएमटीहून गोरेगावला जाणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं विचारात असल्याचं समजतं.

प्रवाशांचा प्रतिसाद

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता प्रथम सीएसएमटी ते गोरेगाव या मार्गावर लोकल चालवण्याचा विचार केला जात आहे. या मार्गावर लोकल चालवताना कोणत्या तांत्रिक समस्या येऊ शकतात याबाबत चाचपणी केली जात आहे.

लोकल फेऱ्या

सध्यस्थितीत हार्बरवर सीएसएमटीतून पश्चिम रेल्वे मार्गावर जाणाऱ्या लोकल फेऱ्या दर १० मिनिटांनी उपलब्ध आहे. त्यामुळं एसी लोकल चालवण्यासाठी हार्बरवर मार्ग उपलब्ध होत आहे. ही एसी लोकल गोरेगावपर्यंत एसी लोकल धावल्यास, ती गोरेगाव ते पनवेल या मार्गावरही धावण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

एसी लोकलची उंची

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल चालविण्यासाठी लोकलची उंची ४.२७० मीटर हवी. मात्र, पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली पहिल्या एसी लोकलची उंची ४.३३५ मीटर असून ती जास्त आहे. मध्य रेल्वे अखत्यारित असलेल्या पुलांची कमी असलेली उंची आणि एसी लोकलची जास्त उंची पाहता याआधी पहिली लोकल चालवण्यास मध्य रेल्वेनं नकार दिला होता. त्यामुळं मध्य रेल्वेवरील एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर वळवण्यात आली होती.



हेही वाचा -

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी मेळावा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा