Advertisement

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी मेळावा

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी अंतिम मेळावा होणार आहे. कामगारांच्या मागण्यांवरून बेस्ट प्रशासनाकडून मंगळवारी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीसमोर सादरीकरण केलं जाणार आहे.

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी मेळावा
SHARES

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मंगळवारी अंतिम मेळावा होणार आहे. कामगारांच्या मागण्यांवरून बेस्ट प्रशासनाकडून मंगळवारी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीसमोर सादरीकरण केलं जाणार आहे. त्यानंतर कृती समितीतर्फे दादरमधील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात संध्याकाळी ५ वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कामगारांसमोर सर्व बाजू ठेवण्यात येणार असून, संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळं बेस्ट प्रशासन आणि कामगार समिती यांच्यात काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

संपाचा इशारा

कामगारांच्या मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं  ६ ऑगस्ट रोजी संपाचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी झालेल्या कामगार मेळाव्यात बेस्ट प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्यानं २० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या वाटाघाटींपुरती संप स्थगिती करण्यात आला होता. 

बैठकीकडं लक्ष

दरम्यान, बेस्ट प्रशासन आणि संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा होत आहे. आतापर्यंत ४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आता मंगळवारच्या बैठकीकडं लक्ष लागले आहे. बेस्टच्या कुलाब्यातील मुख्यालयात ही पाचवी फेरी पूर्ण झाल्यावर समितीचं शिष्टमंडळ मेळाव्याला जाणार आहे. या मेळाव्यात कामगारांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु संप निर्णय घेतल्यास पुन्हा एकदा मुंबईकरांवर बेस्ट संपाचे सावट येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा