Advertisement

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
SHARES

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचं वयाच्या ९२ व्या दीर्घ आजाराने निधन झालं.  प्रकृती खालावल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना जुहूच्या सुजॉय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खय्याम हे दीर्घकाळापासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

पंजाबमधील नवांशहर इथं जन्म झालेल्या खय्याम  यांच्या संगीत करियरला १९४७ साली सुरुवात झाली. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने त्यांची ओळख निर्माण झाली. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली. “कभी कभी’, “उमराव जान’, “त्रिशुल’, “नुरी’ आणि “शोला और शबनम’ अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. 

कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २०१० मध्ये खय्याम यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं होतं. खय्याम यांनी २०० रुपयांची पहिली कमाई केली होती. ख्ययाम यांचा सामाजिक क्षेत्रातही मोठा सहभाग होता. त्यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त १२ कोटी रुपयांची रक्कम 'खय्याम प्रदीप जगजीत' या संस्थेला दिली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा