गणेशोत्सव २०१९: नोंदणी नाही तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्त

नोंदणी नसलेल्या संस्था किंवा मंडळांनी वर्गणी गोळा केल्यास धर्मादाय आयुक्तालयाकडून त्यांच्यावर दंडात्मक आणि कठोर शिक्षेची कारवाई करण्यात येणार असल्याचं धर्मादाय आयुक्तालयानं सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला सुनावलं आहे.

SHARE

मुंबईतील सार्वजनिक मंडळ आणि संस्थांसाठी एक महत्वाची बातमी आहे. धर्मादाय आयुक्तालयाकडं नोंदणी असलेल्या संस्थांनाच केवळ वर्गणी गोळा करण्याचा अधिकार आहे. मात्र, नोंदणी नसलेल्या संस्था किंवा मंडळांनी वर्गणी गोळा केल्यास धर्मादाय आयुक्तालयाकडून त्यांच्यावर दंडात्मक आणि कठोर शिक्षेची कारवाई करण्यात येणार असल्याचं धर्मादाय आयुक्तालयानं सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला सुनावलं आहे.

३ महिने तुरुंगवास

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धर्मादाय आयुक्तालयात गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांची धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीत बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर आणि सदस्य उपस्थित होते. त्यावेळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांविषयीच्या नियमांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये मुख्यत: नोंदणीकृत नसलेल्या मंडळ, संस्थांनी वर्गणी जमा केल्यास त्यांना ३ महिने तुरुंगवास आणि जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंड आकारणीला सामोरं जावं लागणार आहे. नोंदणी नसलेल्या कोणत्याही संस्था अथवा मंडळाला वर्गणी जमा करायची असल्यास त्याकरिता धर्मादाय आयुक्तालयाची परवानगी बंधनकारक आहे.

संकेतस्थळावर अर्ज

याबाबत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर अर्ज असून, त्याची वैधता ६ महिन्यांपुरतीच असणार आहे. त्यानंतर संबंधित मंडळ वा संस्थेनं जमा-खर्च सादर करून शिल्लक रक्कम धर्मादाय आयुक्तालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय, जास्तीतजास्त मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, कोणत्याही गणेशोत्सव मंडळानं मदत केल्यास त्याविषयी आयुक्तालयाला कळवावं, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: मुंबईचा राजा 'असा' पार करणार खड्ड्यांचा अडथळा

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या