Advertisement

गणेशोत्सव २०१९: मुंबईचा राजा 'असा' पार करणार खड्ड्यांचा अडथळा

गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मुरवणुकीत गणेश मंडळांना अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. यामधील मोठी समस्यामध्ये 'रस्त्यांवरील खड्डे'.

गणेशोत्सव २०१९: मुंबईचा राजा 'असा' पार करणार खड्ड्यांचा अडथळा
SHARES

गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मुरवणुकीत गणेश मंडळांना अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. यामधील मोठी समस्यामध्ये 'रस्त्यांवरील खड्डे'. या खड्ड्यांमुळं बाप्पाची उंच मूर्ती असणाऱ्या मंडळांना धोका असतो. त्यामुळं यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत खड्ड्यांचं विघ्न येऊ नये यासाठी 'लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली' म्हणजेच मुंबईचा राजा या मंडळानं अनोखी शक्कल लढवली आहे. या मंडळानं खड्ड्यांवर मात करण्यासाठी तसंच, गणेशमूर्तीसाठी अद्ययावत खड्डेरोधक ट्रॉली तयार करून घेतली आहे.

साडेपाच लाख रुपये खर्च

गणेशगल्ली या मंडळानं वसईच्या एका कंपनीत या ट्रॉलीची निर्मिती केली असून, त्यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च आला आहे. या ट्रॉलीमध्ये धक्के रोखण्यासाठी ट्रॅक्टर्स आणि विमानासाठी वापरण्यात येणारी दणकट चाके बसवण्यात आली असून चाकांमध्ये खास सस्पेंशनची सोय आहे. मागील २ वर्षांपासून विसर्जनादरम्यान येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून ट्रॉलीचं डिझाइन बनवण्यात आले आहे. त्याशिवाय, ट्रॉलीला बसवलेली हायड्रोलिक जॅक प्रणाली विसर्जन तराफ्याची भूमिकाही बजावणार आहे.

पहिल्यांदाच असा प्रयोग

यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येणार आहे. दरम्यान, इतर गणेश मंडळांकडूनही अशा ट्रॉलीसाठी मागणी येत आहे. मात्र, यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत या ट्रॉलीचा प्रयोग केला जाणार आहे. पुढील वर्षीपासून याबाबत इतर मंडळांना मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात येत आहे.हेही वाचा -

जागतिक फोटोग्राफी दिन : आता दृष्टीहीनही करू शकणार फोटोग्राफी

राज यांना पाठवलेली ईडीची नोटीस सूडबुद्धीनेच- बाळासाहेब थोरातसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा