Advertisement

जागतिक फोटोग्राफी दिन : आता दृष्टीहीनही करू शकणार फोटोग्राफी

मुंबईत राहणाऱ्या आदित्य असेरकर या तरूणानं दृष्टीहीनांसाठी खास कॅमेरा तयार केला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीनं दृष्टीहीन आता फोटोग्राफी करू शकतात.

जागतिक फोटोग्राफी दिन : आता दृष्टीहीनही करू शकणार फोटोग्राफी
SHARES
Advertisement

तुम्हाला जर सांगितलं की दृष्टीहीनही आता फोटोग्राफी करू शकतात तर? चकीत झालात ना? जे वाचलंत त्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जात असेल. पण हे खरं आहे. मुंबईत राहणाऱ्या आदित्य असेरकर या तरूणानं दृष्टीहीनांसाठी खास कॅमेरा तयार केला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीनं दृष्टीहीन आता फोटोग्राफी करू शकतात.


ब्ल्युम कॅमेरा

अनेकदा अपंगत्व असलेल्या व्यक्तींकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. अपंगत्व आल्यानं अमुक एखादी गोष्ट त्यांना शक्य नाही, हे ठाम मत अनेकांचं असतं. कुणाला पाय नसेल तर तो धावू शकत नाही. बहिरा असेल तर तो गाणं कसं ऐकेल? पण हा समज अनेक शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आलेल्यांनी खोडून काढलाय. इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे, हे स्वत: आदित्य देखील मानतो. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आलेला व्यक्ती देखील खूप काही करू शकतो, हेच आदित्यला समाजाला सांगायचं आहे. त्यासाठी त्यानं दृष्टीहीनांसाठी एक कॅमेरा तयार केला. ब्ल्युम असं या कॅमेराचं नाव आहे. 


अशी सुचली संकल्पना

आदित्य हा मुळचा मुंबईतल्या चेंबूर इथं राहतो. कर्णबधीर व्यक्तींना संगीत कसं ऐकता येईल यावर तो एक प्रयोग करत होता. या प्रयोगावर काम करत असताना त्याला दृष्टीहिनांसाठीही एक कॅमेरा बनवायची कल्पना सुचली. त्यानंतर त्यानं यावर संशोधन करून कॅमेरा बनवला. हा कॅमेरा इमेज प्रोसेसिंग या तंत्रावर आधारीत आहे आणि वापरकर्त्याला संवेदनशिलतेनं काय पाहिलं त्याची माहिती देतो. ही माहिती कोणत्याही मुख्य भाषेत देता येते जी वापरकर्ता समजतो.


तंत्रज्ञानानं आज एवढी उंची गाठली आहे की कुठल्याही शारीरिक दुर्बलतेला ते सहज मागे टाकू शकतं. तर याच तंत्रज्ञानाचा वापर मी कॅमेरा बनवण्यासाठी केला आहे. कारण जगण्याचा जेवढा हक्क डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टीहिनांनाही आहेच. काही वर्ष हा कॅमेरा मी ट्रायल म्हणून वापरला. पण लवकरच मी हा कॅमेरा बाजारात आणणार आहे. पण समस्या एकच आहे की यासाठी मला काही आर्थिक अडचणी आहेत. जर कुणी मला फायनान्ससाठी मदत केली तर नक्कीच लवकरच हा कॅमेरा दृष्टीहीन वापरू शकतील.

- आदित्य असेरकर
कसा काम करतो हा कॅमेरा?

कॅमेरा पूर्णपणे इंटरनेटद्वारे काम करतो. त्यामुळे इंटरनेटकडे जेवढी माहिती आहे ती सर्व माहिती कॅमेराकडे देखील आहे. कॅमेरामध्ये मदर बोर्ड आहे. मदर बोर्डच्या मदतीनं कॅमेराला हेडफोन देण्यात आला आहे. या हेडफोनच्या मदतीनं दृष्टीहीन व्यक्तीला समोर काय आहे? हे कॅमेरा टिपून सांगत असतो.


कॅमेरा हा स्वयंचलित पद्धतीनं नेमक्या गोष्टी टिपतो. तुमच्या फ्रेममध्ये कोणत्या गोष्टी आहेत याची माहिती देखील देतो. उदाहरणार्थ समोर एखादा डोंगर, नदी, झाड किंवा इमारत असेल तर कॅमेरा दृष्टीहीन वापरकर्त्याला समोरचं सर्व सांगणार. आता एखादा व्यक्ती कॅमेरासमोर असेल तर वापरकर्त्याला त्या व्यक्तीनं काय घातलं आहे? कुठल्या रंगाचं आहे? तो व्यक्ती आनंदी आहे की दु:खी? त्याची दाढी आहे का? त्याच्या मागच्या बॅकग्राऊंडला काय आहे? हे सर्व सांगणार. याशिवाय लोकेशन, अँगल देखील सांगतो. एकदा माहिती मिळाली की फोटो क्लिक केला जातो.

 


कॅमेराची खासियत

एचडी एम आय तंत्रावर आधारीत हा कॅमेरा काम करतो. कॅमेरामध्ये दोन प्रकारचे युएसबी पोर्ट आहेत. यामुळेच फोटोंच्या थ्रीडी प्रिंट काढता येतात. जेणेकरून दृष्टीहीन व्यक्ती त्यांना स्पर्श करून फोटो कसा काढलाय हे कळेल. या पद्धतीला एम्बोस्मेंट म्हणजेच नक्षीकाम म्हणतात. उदाहणार्थ, फोटोमध्ये दगड असतील तर थोडे खडबडीत, पाणी असेल तर सॉफ्ट असं प्रिंटमध्ये येईल.


खरंच आदित्यनं दृष्टीहिनांसाठी काढलेला कॅमेरा त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण आणेल यात काही शंका नाही. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे पण दृष्टीहिन आहेत अशांसाठी हा कॅमेरा वरदान सिद्ध होईल हे नक्की.  हेही वाचा -

असा हाताळा DSLR कॅमेरा

या ट्रिक्स वापरून करा तुमच्या कॅमेऱ्याची लेन्स क्लिन
संबंधित विषय
Advertisement