Advertisement

असा हाताळा DSLR कॅमेरा


असा हाताळा DSLR कॅमेरा
SHARES

DSLR कॅमेरा हाताळणं आता काही नवीन नाही. पण अनेकदा कॅमेरा खूप रफली हाताळला जातो. एकतर तो महाग असतो. त्यात अनेकदा फोटो काढण्याच्या चक्करमध्ये आपण तो नीट हाताळत नाही. मग काही वर्षात कॅमेरा आपल्या निष्काळजीपणाचा बळी ठरतो. त्यामुळे DSLR कॅमेरा कसा हाताळला पाहिजे? त्याची कशी काळजी घेतली पाहिजे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे DSLR कॅमेरा असेल किंवा तुम्ही घेण्याच्या विचारात आहात तर मग तुम्हाला या गोष्टी माहित असणं फारच आवश्यक आहेत. त्यामुळे महागड्या कॅमेराची काळजी कशी घ्यायची याचा काही टिप्स आमच्याकडून.


१) DSLR कॅमेरा अतिशय नाजूक असतो. ट्रीपला जाताना किंवा प्रवासात असताना कॅमेरे सुटकेस किंवा बॅगेत कोंबणे चुकीचे आहे. अनेक जण कॅमेरा खांद्याला घेऊन किंवा हातात घेऊन वावरतात. यामुळे कॅमेरावर स्क्रॅच किंवा लेन्सवर धूळ बसू शकते. त्यामुळे कॅमेरासोबत मिळालेली बॅग वापरण्याची सवय अंगी बाळगा. ही बॅग कॅमेराचे धूळ आणि कचऱ्यापासून संरक्षण करते.

२) कॅमेराची एलसीडी स्क्रीन आणि लेन्स साफ करण्यासाठी विशेष उपकरणांची गरज असते. साध्या कपड्यानं किंवा हलक्या क्वालिटीच्या ग्लास क्लिनरनं अजिबात साफ करू नका. यामुळे कॅमेराच्या लेन्स खराब होऊ शकतात. त्यापेक्षा कॅमेरा शॉपमधून चांगल्या क्वालिटीचं क्लिनिंग किट घ्या.

३) कॅमेरा साफ करताना, मेमरी कार्ड बदलताना, केबल लावताना किंवा काढताना कॅमेरा स्विच ऑफ करणं गरजेचं आहे. कारण कॅमेरा चालू स्थितीत असताना कॅमेऱ्याची कामं केल्यानं तो कायमस्वरूपी खराब होऊ शकतो. लेन्स बदलताना देखील कॅमेरा चालू ठेवल्यास सेन्सरवर धूळ बसू शकते. यामुळे कॅमेराच्या फोटो क्वालिटीवर होऊ शकतो.

४) कॅमेराचा वापर करत नसाल तेव्हा बॅटरी काढून वेगळी ठेवलेलीच बरी. बॅटरीतून अनेकदा अॅसिड लिक होण्याची समस्या उद्भवते. नवीन बॅटऱ्या लिथियमच्या असल्या तरी त्या जास्त कॅमेऱ्यामध्ये जास्त काळ ठेवणं चांगलं नाही. कारण बॅटरीला दमट वातावरणाचा गंध चढतो.

५) DSLR कॅमेरा कधी पडला किंवा इतर कुठल्या कारणामुळे लेन्सवर स्क्रॅच पडू शकतात. त्यामुळे नेहमी लेन्सला फिल्टर लावलेले असावे. यामुळे कॅमेरा जरी पडला तर फिल्टरचे नुकसान होते. लेन्सला काही होत नाही.

६) DSLR कॅमेराची बॉडी अतिशय नाजूक असते. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा कॅमेरावर खूप परिणाम होतो. तुम्ही जर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलात तर लेन्स सोडून बाकी कॅमेरा कव्हर करणं आवश्यक आहे. पावसाळ्यात फोटो काढत असाल तर प्लास्टिक पिशवी लावून फोटो काढा.

७) कॅमेराची बॅटरी संपली किंवा खराब झाली की आपण जी मिळेल ती खरेदी करून कॅमेरात टाकतो. त्यामुळे कॅमेरा खराब होऊ शकतो. त्यामुळे बॅटरी खराब झाल्यास किंवा नवीन खरेदी करायची असल्यास कंपनीशी संपर्क करा.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा