Advertisement

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज

मुंबईतील केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले असून यामधील १ हजार ५ मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे.

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज
SHARES

मुंबईत गणेशोत्सवाच्या तयारील जोरदार सुरू झाली असून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन करत आहेत. गणेशोत्सवाला अवघे २ आठवडेच उरले आहेत. मात्र, अजूनही अनेक मंडळांनी अर्ज केले नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुंबईतील केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले असून यामधील १ हजार ५ मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळं उर्वरित मंडळांनाही परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्याची मुदत २४ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

१२ हजार मंंडळं

मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. यांपैकी केवळ १५ टक्केच मंडळांनी महापालिकेकडं अर्ज केला आहे. मात्र, अनेक मंडळांनी परवानगी घेण्यापूर्वीच गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. मंडपासाठी अर्ज करण्याची मुदत १९ आॅगस्ट म्हणजे सोमवारी संपुष्टात आली आहे़.

अर्जासाठी मुदतवाढ

गणेशोत्सव जवळ आला तरीदेखील ८० टक्के मंडळांनी अद्याप अर्ज केला नसल्यानं मुदतवाढ देण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीनं केली. ही मागणी मान्य करत महापालिका प्रशासनानं २४ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत आलेले अर्ज

  • मंडळांचे एकूण अर्ज - २६२०
  • एकाच मंडळाचे डबल अर्ज - ४२२
  • अर्जांची छाननी - २१९८
  • परवानगी - १००५
  • विविध कारणांमुळं अर्ज रद्द - १८९
  • मंजुरीबाबत प्रक्रिया सुरू - १००४हेही वाचा -

राज भवनमधील भुयार लवकरच हाेणार पर्यटकांसाठी खुलंसंबंधित विषय
Advertisement