Advertisement

राज भवनमधील भुयार लवकरच हाेणार पर्यटकांसाठी खुलं


राज भवनमधील भुयार लवकरच हाेणार पर्यटकांसाठी खुलं
SHARES

मुंबईतील राजभवन येथे ३ वर्षापूर्वी सापडलेल्या भुयाराचं १५ हजार स्क्वेअर फुटाच्या संग्रहालयात रुपांतर करण्यात आलं आहे. भुयारामध्ये साकारण्यात आलेल्या संग्रालयाचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं आलं. हे संग्रहालाय लवकरच मुंबईकरांसाठी पर्यटकांसाठी खूले होणार असून, याच्या माध्यमातून ब्रिटीश काळाची माहिती पर्यटकांना मिळणार आहे.

भुयाराचं संवर्धन 

राजभवनातील हिरवळीखाली आढळलेल्या भुयाराचं संवर्धन होणं आवश्यक होते. म्हणूनच त्याचे स्थापत्य परीक्षण करून या ठिकाणी आभासी वास्तवतादर्शक संग्रहालय उभारण्यात आलं आहे. याद्वारे प्रेक्षकांना तोफा चालवण्याचा आभासी अनुभव घेता येणार आहे. इतिहासातील भुयाराच्या वापराबाबत तसेच राज्यातील गडकिल्ल्यांच्या आणि राजभवनच्या इतिहासाची माहिती देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑनलाइन आरक्षण

या भुयारातील संग्रालयाला भेट देण्यासाठी पर्यटकांना ऑनलाइन आरक्षण करणं बंधनकारक असणार आहे.  या भुयारामध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून दर्शनी भागात २० फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम आणि तोफा आत नेण्यासाठी लांबलचक उतार आहे. तोफांच्या प्रतिकृती व जवानांच्या त्रिमितीय आकृत्याही येथे आहेत. बंकरचा शोध लागला त्या वेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार, शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा