Advertisement

गणेशोत्सव २०१९: पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांची परिस्थिती लक्षात घेत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

SHARES

मुंबईसह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर आणि सांगली यांसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. घरातील सर्व सामान पूराच्या पाण्यत वाहून गेल्यानं जगायचं कसं असा प्रश्न या पूरग्रस्तांना पडला होता. खाण्या-पिण्याची सोय नसल्यामुळं अनेक कुटुंबियांनी २४ ते ४८ तास पाण्यत काढले. माणसांसह जनावरही पाण्याखाली होती. त्यांचीही मोठी गैस सोय होत होती. त्यामुळं त्यांची ही परिस्थिती लक्षात घेत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FMumbaiLiveMarathi%2Fvideos%2F2439627469460066%2F&show_text=0&width=560

विविध माध्यमातून मदत

मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांपासून आगदी छोटी मंडळही या पुरग्रस्तांची मदत करण्यासाठी निधी गोळा करत आहेत. दानपेठी, समाजकार्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जीवनाश्यक वस्तू जमा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क (परळचा राजा) यांसारख्या अनेक मंडळं या पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसह जिवनाश्यक वस्तूही पुरवत आहेत.

समितीचं आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सातारा, सांगली, कोल्हापुर तसंच इतर ठिकाणी मागील काही दिवसात पावसामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात पूर आला आणि येथील सर्वांचे जे अतोनात नुकसान झाले ते पाहता मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव मंडळानी गणेशोत्सव सजावटीवरील खर्च कमी करुन पुरग्रस्त नागरिकांना मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत, वस्तु रूपानं आणि औषधं अशी विविध मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

मदत पुरेशी ठरेल?

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची ही मदत पुरेशी ठरेल का? याबाबत मुंबई लाइव्हनं काही गणेश मंडळांसोबत बातचित केली. त्यांनी आपल्या मंडळाकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, यंदा सजावटीवर होणार खर्च कमी करावा असंही त्यांनी म्हटलं.  

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

मुंबईसह उपनगरातील अनेक गणेश मंडळांनी विविध संकल्पनेतून मदतीचा हात पुढे केला आहे. नुकताच आगमन झालेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी म्हणजेच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर बेघर झालेल्या पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपये देण्याचं ठरविलं आहे. या मंडळानं अनोखा उपक्रम राबवला. आगमनाच्या सोहळ्यादरम्यान मिरवणुकीत ४ दानपेट्या ठेवल्या होत्या. तसंच, येणाऱ्या भाविकांना मदतीचं आवाहन केलंया दानपेट्यांत जमा होणारी रक्कम देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

चिंचबंदर-डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (डोंगरीचा राजा)

चिंचबंदर-डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं (डोंगरीचा राजा) गणेश उत्सवात दानपेटीत जमा होणारी सर्व रक्क्म आपल्या महाराष्ट्रावर जी भीषण अशी पुरस्थिती निर्माण झाली आहे, त्याला मदत म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं जाहीर केलं आहे.

शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून प्रत्यक्ष पुरसदृश ठिकाणी जाऊन मंडळाच्या वतीनं रुपये १,००,०००/- किमतीचं शालेय व जिवनाश्यक वस्तूंचं वाटप १५ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात येणार आहे. मंडळानं हाती घेतलेल्या या सामाजिक उपक्रमामध्ये आपण देखील व्यक्तिशः सढळ हस्ते मदत करून पूरग्रस्तांना मदत करावी.

बाळगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ

पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ट्रस्टहेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिता

'असं' झालं 'गवालिया टँक'चं 'आॅगस्ट क्रांती मैदान'! तुम्हाला हा रंजक इतिहास माहीत आहे का?संबंधित विषय
Advertisement