Advertisement

गणेशोत्सव २०१९: गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिता

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्याप लागू झाली नसली तर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं यंदाच्या गणेशोत्सवासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे.

गणेशोत्सव २०१९: गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिता
SHARES

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्याप लागू झाली नसली तर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं यंदाच्या गणेशोत्सवासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये, ध्वनिक्षेपकांच्या बाबत नियमांचं काटेकोर पालन करावं, प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला प्रसाद स्वीकारू नये, अतिरेकी कारवायांच्या व दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय करावे, देखाव्यांमधून कुठल्याही राजकीय पक्षावर टीका करू नये, अशी तब्बल २४ पानी आचारसंहिता सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं जारी केली आहे.

उत्सवाला गालबोट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील काही कार्यकर्त्यांच्या बेताल वागण्यामुळं उत्सवाला गालबोट लागतं. वर्गणीच्यावेळी भाविकांशी वाद घालणे, आवाजाची मर्यादा न पाळणं, आगमन आणि विसर्जनावेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यांसारख्या विविध कारणांमुळं दिवसेंदिवस सार्वजनिक गणेशोत्सवाचं विद्रूपीकरण होत चालल्याची टीका समाजातून होत असल्यानं ही आचारसंहिता जारी केल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

मंडळांसाठी नियमावली

  • स्वखुशीनं देणाऱ्यांकडून वर्गणी गोळा करावी, कोणावरही जबरदस्ती करू नये, वर्गणीची पावती द्यावी.
  • वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेऊनच मंडप उभारावे.
  • मंडपातील देखावे आक्षेपार्ह नसावे. इतर धर्मीयांच्या भावना दुखवणारे तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर किंवा कोणावरही वैयक्तिक टीका करणारे नसावेत.
  • विसर्जन मिरवणुकांमध्ये एकाच जागी थांबून नाचत राहू नये, मागून येणाऱ्या मिरवणुकांना अडथळा करू नये.
  • प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पूजेचे साहित्य नाकारावे.
  • अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंडपाभोवती मेटल डिटेक्टर बसवावे, भाविकांच्या हातातील वस्तूंची पाहणी करावी.

ध्वनिक्षेपकांवरून गेल्या काही वर्षांत पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात खटले दाखल केले होते. त्यामुळं समन्वय समितीनं ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत स्वतंत्र नियमावली दिली आहे. ध्वनिक्षेपक नेमून दिलेल्या वेळेतच लावावे तसंच उत्सव कालावधीत नेमून दिलेल्या ४ दिवशीच १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावावे. अन्य दिवशी १० वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक लावावे. धार्मिक गाणी, भक्तिगीते, मंगलमय वातावरण करणारे संगीत लावावे. त्याशिवाय ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक मंडपात लावताना कंत्राटदाराला याबाबत माहिती द्यावी, कंत्राटदाराशी तसा करार करावा. त्यामुळं कायद्याचं उल्लंघन झाल्यास कंत्राटदाराला जबाबदार धरता येईल, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा