मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे

१५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारी या दोन दिवशी सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. या दोन राष्ट्रीय सणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीनंही पुढाकार घेत राष्ट्रगीत गायलं आहे, जे राष्ट्रगीताचा अभिमान जागवणारं आहे.

  • मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
  • मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
  • मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
  • मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
  • मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
  • मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
SHARE

१५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारी या दोन दिवशी सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. या दोन राष्ट्रीय सणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीनंही पुढाकार घेत राष्ट्रगीत गायलं आहे, जे राष्ट्रगीताचा अभिमान जागवणारं आहे.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन राष्ट्रीय सणांचं औचित्य साधत दरवर्षी मोठ मोठे हिंदी सिनेमे बॅाक्स आॅफिसवर प्रदर्शित केले जातात. या शर्यतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांचे चित्रपट सामील असतात. मराठी चित्रपटसृष्टी मात्र आजवर कधीच या शर्यतीत सहभागी झाली नाही. मराठी कलाकारांनीही कधी याचं भांडवल केलं नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन मांडणं हे मनात कायम राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलीत ठेवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीला कदाचित पसंत नसावं. आपल्या मनात राष्ट्रगीताबाबत नितांत आदराची भावना असल्याचं त्यांनी 'जन गण मन...' गात व्यक्त केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क ७५ कलाकारांनी 'जन गण मन...'चा सूर आळवत मराठी रसिकांच्या मनात राष्ट्रगीताबाबतची भावना जागृत करण्याचं काम केलं आहे. पांढऱ्या रंगाची वस्त्रे परीधान केलेले मराठमोळे कलाकार आणि बॅकग्राऊंडला तिरंगा फडकणारी राष्ट्रगीताची व्हिडिओ क्लीप प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ७५ कलाकारांच्या या टीममधील काही कलाकार आज हयात नाहीत, पण या व्हिडियो क्लीपच्या माध्यमातून ते कायमचे अजरामर झाल्याचं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांच्या स्मृती या व्हिडिओच्या माध्यमातून कायम राहणार आहेत.

मराठी रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे निळू फुले, रमेश भाटकर, सुलभा देशपांडे, रीमा लागू, स्मिता तळवलकर, विनय आपटे, विजय चव्हाण, आनंद अभ्यंकर हे चेहरे आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरी राष्ट्रगीताच्या या व्हिडीओच्या माध्यमातून नेहमी समोर येत राहणार आहेत. या कलाकारांच्या जोडीला दिलीप प्रभावळकर, फैयाज, मोहन जोशी, प्रदीप वेलणकर, अरुण नलावडे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, भारती आचरेकर, वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, डॅा. गिरीश ओक  या ज्येष्ठ कलाकारांनीही आपापल्या परीनं राष्ट्रगीतच्या या व्हिडिओत रंग भरले आहेत.

यांच्या जोडीला मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार चेहरे म्हणून ओळखले जाणारे अश्विनी भावे, निर्मिती सावंत, प्रिया बेर्डे, अतुल परचुरे, संजय मोने, सुकन्या मोने, संदिप कुलकर्णी, श्रेयस तळपदे, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, तुषार दळवी, भरत जाधव, विजय गोखले, संजय नार्वेकर, प्रशांत दळवी, सीमा देशमुख, आस्ताद काळे, संतोष जुवेकर, आदिती सारंगधर, शैलेष दातार, पंकज विष्णू, हर्षदा खानविलकर, प्रसाद ओक, अमृता सुभाष, सुनील बर्वे, सोनाली खरे, सुमीत राघवन, रेशम टिपणीस, विजय पाटकर, विनय येडेकर, प्रदीप पटवर्धन, विजय कदम, जयवंत वाडकर, निलम शिर्के, उमेश कामत, सुलेखा तळवलकर, आदेश बांदेकर, मधुराणी प्रभुलकर, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी लागू, सुशांत शेलार, शरद पोंक्षे, अभिजीत केळकर, तेजा देवकर, प्रथमेश कुलकर्णी लक्ष वेधून घेतात.

३५ सेकंदांच्या या व्हिडीओची संकल्पना अभिनेता पुष्कर श्रोत्रीची असून, दिग्दर्शनही त्यानंच केलं आहे. २००७ मध्ये हा व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. मराठीतील दिग्गजांची मांदियाळी असलेला हा व्हिडीओ आज चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात नाही याची खंत केवळ कलाकारांनाच नव्हे, तर प्रत्येक मराठी माणसाला आहे. यामागील नेमकं कारण काय ते ठाऊक नाही, पण चित्रपट दाखवण्यापूर्वी हा व्हिडिओ सिनेमागृहांमध्ये दाखवला गेला पहिजे असं सर्वांनाच वाटतं. इतर भाषिक चित्रपटांच्या वेळी जरी नाही दाखवला गेला तरी मराठी कलाकारांवर चित्रीत करण्यात आलेला राष्ट्रगीताचा हा व्हिडिओ मराठी चित्रपटांचं प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी तरी दाखवायलाच हवा... नाही का? तुम्हाला काय वाटतं?


https://www.youtube.com/watch?time_continue=2&v=12Io_oM5esk
संबंधित विषय
ताज्या बातम्या