Advertisement

'असं' झालं 'गवालिया टँक'चं 'आॅगस्ट क्रांती मैदान'! तुम्हाला हा रंजक इतिहास माहीत आहे का?

स्वातंत्र्य संग्रामातील अनेक महत्वाचे टप्पे मुंबईच्या धर्तीवर पार पडले आहेत. या टप्प्याचं साक्षीदार असलेलं एक ठिकाण म्हणजे 'ऑगस्ट क्रांती मैदान'.

'असं' झालं 'गवालिया टँक'चं 'आॅगस्ट क्रांती मैदान'! तुम्हाला हा रंजक इतिहास माहीत आहे का?
SHARES

भारत स्वातंत्र्य होऊन ७२ वर्ष पूर्ण झाली. देशभरात स्वातंत्र्य दिवस साजला केला जात आहे. स्वातंत्र्य संग्रामातील अनेक महत्वाचे टप्पे मुंबईच्या धर्तीवर पार पडले आहेत. या टप्प्याचं साक्षीदार असलेलं एक ठिकाण म्हणजे 'ऑगस्ट क्रांती मैदान'. 

'चले जाव'चा इशारा

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचं मोठं महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला 'चले जाव' चा इशारा दिला होता. हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा असून, ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ हे दोन मंत्र या लढ्यानं दिले होते.


देशभरात भडका

या आंदोलनाला ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील ‘गोवालिया टँक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली होती. त्यानंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरवात झाली. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला लोकं जुमानत नव्हते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. या सर्व प्रकाराला सरकारनं महात्मा गांधीजी यांना जबाबदार ठरवलं होतं. ब्रिटिशांनी गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलं. 


आॅगस्ट क्रांती दिन 

यावेळी अटकेत असलेल्या महात्मा गांधींनी आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता २१ दिवस उपोषण केलं. १९४४ मध्ये त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाल्यानं त्यांची ब्रिटिशांनी सुटका केली. त्यावेळी गांधीजी आणि काँग्रेसला या आंदोलनामुळं देशातील काही नेत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. अखेर ३ वर्षात देश स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्याला या आंदोलनाचा दणकाच कारणीभूत ठरला. त्यामुळं '९ ऑगस्ट' हा दिवस 'ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून ओळखला जातो.

अर्थ काय?

मध्य मुंबईत वसलेल्या या मैदानात गाय आणि इतर पशूंना धुण्यासाठी एक टँक होती. 'गो' म्हणजे गाय आणि 'वाला' म्हणजे त्या जनावरांचा मालक. त्यामुळे या मैदानाला गोवालिया टँक म्हणून ओळखलं जात होतं. परंतु त्यानंतर या मैदानाला सन्मानपूर्वक 'आॅगस्ट क्रांती मैदान' असं नाव देण्यात आलं.


दुर्लक्षीत मैदान

मुंबईतील मणिभवनजवळ असलेलं हे मैदान ५ विभागात विभागलेलं आहे. त्यातील सर्वात मोठा भाग हा खेळाच्या मैदानासाठी आहे. तसंच वृद्धांसाठी एक उद्यान आणि लहान मुलांसाठी क्रीडांगण आहे. मैदानातील एका भागात हुतात्म्यांचं स्मारक आहे. हे मैदान म्हणजे एका महान ऐतिहासिक घटनेचा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा एक भाग आहे. परंतु, दुर्दैवाने या मैदानाचा पर्यटन पुस्तकात उल्लेख आढळून येत नाही.हेही वाचा-

गणेशगल्लीत यंदा पाहायला मिळणार राम मंदिराची प्रतिकृती

'ब्रो'ला भिडणार 'दादूस', बोलीभाषा जपणाऱ्या मराठमोळ्या राख्यासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा