Advertisement

'ब्रो'ला भिडणार 'दादूस', बोलीभाषा जपणाऱ्या मराठमोळ्या राख्या

ब्रो, कुल ब्रो, मेरा भाई, भैय्या मेरे अशा राख्या बाजारात भाव खाऊन जात होत्या. पण आता या राख्यांना टक्कर द्यायला आपल्या मराठी भाषेतील राखी देखील बाजारात आली आहे.

'ब्रो'ला भिडणार 'दादूस', बोलीभाषा जपणाऱ्या मराठमोळ्या राख्या
SHARES

राखी पौर्णिमेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शहरातील बाजारपेठा राख्यांच्या दुकानांनी सजलेल्या पहायला मिळत आहेत. पारंपरिक गोंड्याच्या राख्यांपासून ते नव्या विविध ट्रेंडी राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत. यावर्षीची राखी काही तरी वेगळी हवी, असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं. हल्ली काय तर म्हणे इंग्रजी, हिंदी अक्षरं कोरलेल्या राख्या बहिणींच्या जास्त पसंतीस उतरत आहेत. ब्रो, कुल ब्रो, मेरा भाई, भैय्या मेरे अशा राख्या बाजारात भाव खाऊन जात होत्या. पण आता या राख्यांना टक्कर द्यायला आपल्या मराठी भाषेतील राखी देखील बाजारात आली आहे.


'ब्रो'ला भिडणार दादूस

मुंबईतल्या श्रीरंग संस्था बोलीभाषेचे महत्त्व पटवणाऱ्या राख्यांबद्दल जनजागृती करत आहे. ब्रो आणि भैय्याच्या जमान्यात आता भावड्या, भाऊराया, दादूस, दिद्या, दादा, माई, आक्का हे हक्काचे शब्द राख्यांवर उमटलेले पाहायला मिळणार आहेत. मराठी भाषेत कितीही इंग्रजी शब्द मिसळले तरीही आपल्या बोलीतले शब्द आपुलकीचे वाटतात. त्यामुळे या शब्दांवर आधारित राख्यांचा प्रचार श्रीरंग संस्थेतर्फे केला जात आहे. रक्षाबंधन साजरा करताना आपल्या आईसमान असलेली बोलीभाषा देखील जगवा असं आवाहन या निमित्तानं श्रीरंग संस्थेतर्फे करण्यात येत आहे.


संकल्पना कुणाची?

कलादिग्दर्शक सुमित पाटील यांची ही संकल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित एक व्हिडिओ देखील बनवण्यात आला आहे.

मराठी शब्दसंपदा प्रचंड मोठी आहे. पण दुसऱ्या भाषांच्या प्रवाहात आपल्याला मराठी शब्दांचा विसर पडू लागला आहे. ब्रो, सिस या वाक्यांचा वापर अधिक होतो. ताई, माई, आक्का, दादूस या शब्दांचा आपल्याला विसर पडू लागला आहे. त्यामुळे सणागणिक आपण आपली बोलीभाषा जपण्याचा प्रयत्न केला पहिजे. म्हणून आम्ही बोली भाषेतील राखी ही संकल्पना आणली.

सुमित पाटील, श्रीरंग संस्थाकशी मागवाल राखी?

सुमित पाटील यांच्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या बोली भाषेतील राख्या बहिणींच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. तुम्हाला देखील या मराठमोळ्या राख्या मागवायच्या असतील तर ९७७३७७०५०७ क्रमांकावर व्हाॅट्सअप मेसेज करा.

आतापर्यंत आपण दुसऱ्यांचे ट्रेंड जपत आलो. पण आता आपल्याकडे असलेली मराठी शब्दांची विविधता का जपू नये? म्हणून मी म्हणते आईसमान असलेली आपली बोली जगवूया. रक्षाबंधन साजरी करूया.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा