Advertisement

विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा १२५-१२५ फॉर्म्युला

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात १२५-१२५ फॉर्म्युला ठरल्याची माहिती काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिली.

विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा १२५-१२५ फॉर्म्युला
SHARES

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात १२५-१२५ फॉर्म्युला ठरल्याची माहिती काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिली. छाननी समितीत विद्यमान आमदारांची ठरवून ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली जातील, असंही दलवाई म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या छाननी समितीत अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

७० ते ८० नावं निश्चित

याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून निवडणुका लढण्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत आहे. त्यानुसा जागा कशा रितीने वाटून घेता येतील, यावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यात ७० ते ८० विद्यमान आमदारांच्या नावाची यादी तयार  झाली आहे.

चर्चेची दारं खुली

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चेची दारं बंद झालेली नाही. परंतु आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. हर्षवर्धन पाटील यांच्या विषयी शरद पवार  सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. तर मनसेला आघाडीमध्ये घेण्याबाबत चर्चा अजून तरी झालेली नाही, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.



हेही वाचा-

भाजपाने दरवाजे उघडल्यास विरोधकांमध्ये पवारांशिवाय कुणीही उरणार नाही- शहा

राष्ट्रवादीचं ‘भुज’बळ जाणार? सुप्रिया सुळेंच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा