Advertisement

राष्ट्रवादीचं ‘भुज’बळ जाणार? सुप्रिया सुळेंच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेला निमित्त ठरलंय ते राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य.

राष्ट्रवादीचं ‘भुज’बळ जाणार? सुप्रिया सुळेंच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेला निमित्त ठरलंय ते राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य.

राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून बाहेर पडत आहेत. त्यात छगन भुजबळ यांच्या नावाचाही समावेश आहे. ते शिवसेनेत जातील, अशी शक्यता असली, तरी दोन्ही बाजूंनी ही शक्यता नाकारण्यात आली आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया?

१५ वर्षे आम्ही सत्तेत होतो. पण सध्या पक्षाच्या कठीण काळात माणसं सोडून जात आहेत. त्याबद्दल वाईट वाटत असलं, तरी सोडून जाणाऱ्याबद्दल आमच्या मनात कुठलाही द्वेष नाही. कुणावरही दबाव टाकणं आमच्या तत्वात बसत नाही. कारण लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. शिवाय पक्ष सोडून जाणाऱ्या प्रत्येकाने कधी ना कधी माझ्या वडिलांना साथ दिल्याची मला जाणीव आहे.

हेही वाचा- माझ्या मनगटावर घड्याळच! भुजबळांनी फेटाळली शिवसेना प्रवेशाची शक्यता

मोबाइल स्कीम बदलण्यासारखं

आज पक्ष बदलणं म्हणजे मोबाइल स्कीम बदलण्यासारखं झालं आहे. रिजेक्ट मालाचं पॅकेज बदललं म्हणून तुम्ही घेणार का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे डॅशिंग रसायन आहे. रसायनाच्या कारखान्यात जाता तेव्हा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जाणाऱ्यांनी कुठं जायचं हा त्यांचा विषय असला, तरी रसायनामुळं तुमचं काही होईल हे सांगता येणार नाही, असं वक्तव्य केलं.

उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत म्हणजेच स्वगृही प्रवेश करणार अशा बातम्या फिरत होत्या. यामुळे नाशिकमधील शिवसैनिकही अस्वस्थ झाले हाेते. या शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठून भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला त्रास आजही आमच्या लक्षात आहे आम्ही ते विसरलेलो नाही, अशा शब्दांत आपल्या भावना उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केल्या. अखेर या बातम्यांना लगाम घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत भुजबळांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही, हे स्पष्ट केलं. 



हेही वाचा-

मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?

आहे तिथेच राहा! भुजबळांविरोधात शिवसैनिकांचे बॅनर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा