काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करणार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.

SHARE

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करणार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. सोबतच 'एमआयएम' देखील आघाडीतून बाहेर पडल्याने वंचित आता स्वबळावर निवडणूक लढणार हे स्पष्ट झालं आहे.  

प्रस्तावाकडं दुर्लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress)सोबत आघाडी करण्यास इच्छुक असलेल्या वंचित (VBA)ने काँग्रेसला १४४ जागांची आॅफर दिली होती. पण आघाडीत राष्ट्रवादी सोबत नको अशी अट देखील घातली होती. या प्रस्तावाला काँग्रेसकडून कुठलंही उत्तर न आल्याने काँग्रेसशी यापुढं चर्चा करण्याचं वंचितने ठरवल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. 

काँग्रेसकडून ब्लॅकमेलिंग

वंचितने काँग्रेसपुढं जाचक अटी ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे, यावर प्रश्न विचारला असता, ज्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार सलग ३ वेळेस पराभूत झाले आहेत, अशाच जागा आम्ही काँग्रेसकडून मागितल्या होत्या. हारलेल्या जागा मागणं यांत जाचकपणा काय? काँग्रेसच्या अशाच ब्लॅकमेलिंगमुळं इतर घटकपक्षही त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाहीत, असं आंबेडकर म्हणाले.

शेवटपर्यंत वाट बघणार

लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ (MIM)ला सोबत घेऊन लढलेल्या वंचितला चांगली मतं मिळाली होती. औरंगाबादमध्ये ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील निवडून आले होते. मात्र विधानसभेच्या जागावाटपात आंबेडकर सन्मान राखत नसल्याचं म्हणत ‘एमआयएम’ स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा जलील यांनी केली. मात्र ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी आपली जागावाटपावर बोलणी सुरू असून फाॅर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची वाट पाहणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.हेही वाचा-

वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार

विधानसभा निवडणूक २०१९: मुंबईत काँग्रेस २९, तर राष्ट्रवादी ७ जागा लढवणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या