२८८ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार- आंबेडकर


SHARE

वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २८८ जागा लढवणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आमच्या २५० जागा येतील, असा दावा मी करणार नाही, असं वक्तव्य ‘वंबआ’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

‘एमआयएम’ने युती तोडली

विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ‘एमआयएम’ने आमच्यासोबतची युती तोडली आहे. असं असलं तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कुठलीही कटुता नाही. काँग्रेससोबत देखील आम्ही चर्चा थांबवली आहे.


मुस्लिमांना उमेदवारी देणार

वामनराव चटप यांची शेतकरी संघटना, लाल निशाण पक्ष, सीपीआय-सीपीएमचा एक गट व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आमच्यासोबत आहे. या निवडणुकीत आमच्याकडून मुस्लिमांना पुरेसं प्रतिनिधीत्व दिलं जाईल. ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मौलाना उस्मान रहेमान शेख, नायब अन्सारी यांच्याशी आमची चर्चा झाली असून बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलूनच मुस्लिम उमेदवार निश्चित करण्यात येईल.  


ईव्हीएम हॅक होतं

वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार असली, तरी किती जागांवर विजयी होऊ ते आताच सांगता येणार नाही. कारण मला ईव्हीएमची भीती वाटते. ईव्हीएम हॅक होत असल्याचं मला एका हॅकरने शपथपत्राद्वारे सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील मतदान आणि मतमोजणीनंतरचं मतदान याचा ताळमेळ निवडणूक आयोगानेच सिद्ध करावा’, अशी मागणीदेखील आंबेडकर यांनी केली. 


हेही वाचा-

संबंधित विषय
ताज्या बातम्या