Advertisement

ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह ७० जणांवर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने मंगळवारी गुन्हा नोंदवला. याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. बारामतीपाठोपाठ बुधवारी मुंबईच्या ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली.

 महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह ७० जणांवर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. या ७० जणांच्या यादीत विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांचाही सहभाग आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सरकारने सूडबुद्धीचे राजकारण करत, निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचा आवाज दाबण्याच्या उद्देशाने ईडीकडून कारवाई करत आहे. या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक ईडी कार्यालयाबाहेर जमत निदर्शने करत सरकार विरोधी घोषणा दिल्या. त्यावेळी पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी परिस्थिती हाताळत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांच्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.  हेही वाचा -

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा