Advertisement

शरद पवार लढवणार का साताऱ्याची पोटनिवडणूक? उदयनराजेंची कोंडी करण्याची खेळी


शरद पवार लढवणार का साताऱ्याची पोटनिवडणूक? उदयनराजेंची कोंडी करण्याची खेळी
SHARES

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उभे राहिल्यास निवडणुकीतून बिनशर्त माघार घेईन, असं जाहीर वक्तव्य भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून उदयनराजेंची कोंडी करण्याकरीता ही पोटनिवडणूक पवार यांनीच लढवावी, असा राष्ट्रवादीतील नेत्यांकडून पवार यांना आग्रह करण्यात येत आहे.  

विधानसभेचा फायदा

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर २१ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होत असल्याने उदयनराजेंना त्याचा फायदा मिळणार आहे.  

पवारांबद्दल आदर

यासंदर्भात पत्रकारांनी उदयनराजेंना विचारलं असता, ते म्हणाले की, शरद पवारांबद्दल मला कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहील. पवार हे मला वडिलधाऱ्यांच्या स्थानी आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही.  

चव्हाणांचा नकार

त्यामुळे ही पोटनिवडणूक पवार यांनीच लढवावी, अशी गळ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत घातली. या बैठकीला जयंत पाटील, अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. 

उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखवली. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी पोटनिवडणूक लढण्यास नकार दिल्याचं समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ही व्यूहरचना आखली आहे. 



हेही वाचा-

पवारांनी मला ‘हे’ दिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही- उदयनराजे

नाराज उदयनराजेंच्या जीवात जीव, साताऱ्याची पोटनिवडणूक जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा