Advertisement

शिवस्मारकात भ्रष्टाचार नाही, चौकशीला सामोरे जाण्यास तयार- चंद्रकांत पाटील

'अरबी समुद्रात होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वा अनियमितता झालेली नाही. याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,' असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

शिवस्मारकात भ्रष्टाचार नाही, चौकशीला सामोरे जाण्यास तयार- चंद्रकांत पाटील
SHARES

'अरबी समुद्रात होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वा अनियमितता झालेली नाही. याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,' असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

शिवस्मारकाच्या कामात भाजप सरकारनं भ्रष्टाचार केला असून सत्ताधाऱ्यांकडून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले.

'शिवस्मारकाच्या कामासाठी काढण्यात येणाऱ्या टेंडरची किंमत ३८०० कोटी रुपयांवरून कमी करत आमच्या सरकारने २५०० कोटींवर आणली आहे. या कामासाठी अजून एक पैसाही मोजण्यात आलेला नाही. या कामात कुठलाही भ्रष्टाचार वा अनियमितता न झाल्याने आम्ही या प्रकरणी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.’ उलट या कामामुळे काही जणांच्या पोटात दुखत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

दरम्यान राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे आमदार 'मी सावरकर' असं लिहिलेल्या टोप्या घालून विधान भवनात आले होते. विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निर्दशने केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वत: फलक घेऊन पायऱ्यांवर उभे होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा