Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

नवीन बीकेसी योजना एमएमआरडीएने गुंडाळली

वडाळ्यातील ट्रक टर्मिनलच्या जागी नवीन बीकेसी उभारण्याची योजना एमएमआरडीएने गुंडाळली आहे.

नवीन बीकेसी योजना एमएमआरडीएने गुंडाळली
SHARES

वडाळ्यातील ट्रक टर्मिनलच्या जागी नवीन बीकेसी उभारण्याची योजना एमएमआरडीएने गुंडाळली आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे-कुर्ला काॅम्प्लेक्स (बीकेसी) च्या धर्तीवर नवीन बीकेसी उभारण्याची योजना एमएमआरडीएने आखली होती. 

 ही योजना एमएमआरडीएने स्वत: राबवून नफा कमवावा किंवा बिल्डरकडे सोपवावी, असा एमएमआरडीएचा अंतर्गत अहवाल होता. मात्र, बिल्डरकडे योजना सोपवण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने योजनेबाबत निर्णय घेणे टाळले जात होते. परिणामी मागील दोन वर्षांपासून ही योजनाच पुढे सरकली नव्हती. 

एमएमआरडीएच्या अंतर्गत अहवालात म्हटलं होतं की, ९०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प एमएमआरडीएने स्वत: राबवावा. या प्रकल्पाचा बांधकाम खर्च ३०० कोटी रुपये येईल व बाजारभावाने विकल्या जाणाऱ्या गाळ्यांतून ६०० कोटी रुपयांचा महसूल मिळेल. त्यानंतर दरवर्षी किमान १० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. तर  नवीन बीकेसी बिल्डरकडून मोफत बांधणी करून घ्यावी. त्या मोबदल्यात त्याला दोन भूखंड द्यावेत. मात्र, त्यामुळे एमएमआरडीएला १२०० कोटी रु.चा भुर्दंड बसेल, अशी दुसरी बाजूही या अहवालात नमूद करण्यात आली होती. नवीन बीकेसी प्रकल्प बिल्डरकडे देण्याचा एमएमआरडीचा प्रयत्न होता. मात्र तसं धाडस दाखवले जात नव्हते. त्याऐवजी निर्णय घेणेच टाळले जात होते.

अशी होती योजना

व्यावसायिक उपक्रमासाठी १२.१२ हेक्टर, निवासी संकुलासाठी २.३६ हेक्टर, विविध प्रकारच्या वाहतूक सेवांसाठी १८.४४ हेक्टर, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी २.३५ हेक्टर जागा, सार्वजनिक सेवा, राखीव हरित पट्टा, मोकळी मैदाने, ४१ मजल्यांचे तीन टॉवर, ९०० एसटी बसगाड्यांना गाड्यांना ये-जा करण्यासाठी विशेष व्यवस्था असे या योजनेचे स्वरूप होते.हेही वाचा -

मेट्रो-३: आंध्र प्रदेशात बांधणार ८ डब्यांच्या ३१ मेट्रो

म्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा