Advertisement

म्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ

म्हाडा प्राधिकरणाचे राज्यात दोन हजारांच्या आसपास कर्मचारी आणि अधिकारी आहेत. या सर्वांनाच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

म्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ
SHARES

म्हाडाच्या संपूर्ण राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार नोव्हेंबरच्या पगारात वाढीव रक्कम जमा होणार आहे. वेतनातील ही वाढ १५ टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज केला जात आहे. 

म्हाडा प्राधिकरणाचे राज्यात दोन हजारांच्या आसपास कर्मचारी आणि अधिकारी आहेत. या सर्वांनाच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.  काही महिन्यांपूर्वी प्राधिकरण बैठकीमध्ये वेतन आयोगाचा लाभ मिळण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने वेतनवाढीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. आता ही पगारवाढ मिळणार आहे. 

एक किंवा दोन दिवसांत वाढीव पगाराची नवीन पावती हाती मिळणार आहे. या सर्व प्रक्रियेस काही दिवस लागल्याने नोव्हेंबरचा पगार मिळण्यास विलंब झाला आहे. मात्र, नवीन वाढ मिळताना त्यात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून उशीर झाल्यास हरकत नाही, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांची आहे.



हेही वाचा  -

म्हाडा कोकण मंडळाची साडेसहा हजार घरांची लॉटरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा