Advertisement

म्हाडा कोकण मंडळाची साडेसहा हजार घरांची लॉटरी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) या घरांचा समावेश आहे.

म्हाडा कोकण मंडळाची साडेसहा हजार घरांची लॉटरी
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साडेसहा हजार घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे.  खासगी विकासकांकडून म्हाडाला जी २० टक्के घरे मिळाली आहेत त्यांची किंमत ठरविण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होताच जाहिरात दिली जाणार आहे. 

नवी मुंबई, खोणी, शिरढोण, ठाणे, पलावा या ठिकाणी ही घरे असणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) या घरांचा समावेश आहे. राज्यामध्ये सरकारतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) ‘सर्वांसाठी घरे’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेत कल्याण-शिरढोण परिसरात अडीच हजार तर खोणी येथे अडीच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. २०२१ पर्यंत ही घरे बांधून पूर्ण करण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाचा मानस आहे.

 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या योजना मंजुरीच्या प्रक्रियेचे काम म्हाडा कोकण मंडळाकडून अंतिम टप्प्यात सुरू आहे.  हे काम आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत म्हाडा कोकण मंडळाची ही लॉटरी जाहीर होईल. तसंच २० टक्के घरे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणार आहेत.



हेही वाचा  -

वांद्रे- वर्सोवा सी-लिंकच्या कामाला सुरुवात

एमएमआरडीएमार्फत पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटींचा निधी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा