मुंडकं नसलेल्या मृतदेहामुळे घाटकोपरमध्ये खळबळ

नाल्यात पडलेल्या एका गोणीतून हा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ती गोण नाल्यातून बाहेर काढून पाहिल्यानंतर त्यात मुंडकं नसल्याचा महिलेचा मृतदेह होता

मुंडकं नसलेल्या मृतदेहामुळे घाटकोपरमध्ये खळबळ
SHARES

मुंबईच्या माहिममध्ये एका बॅगेत मृतदेहाचे तुकडे सापडल्याची घटना ताजी असतानाच, घाटकोपरमध्ये एका गोणीत मुंडकं नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपर पोलीस स्थानकाच्या हद्दीत विद्याविहारमध्ये किरोळ रोडवरील एसटी वर्क शाॅपच्या समोरील नेव्ही गेटच्या बाजूला असलेल्या गटारात हा मृतदेह सापडला.  मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 विद्याविहार येथे एका नाल्यातून उग्रवास येत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला सोमवारी सकाळी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता. नाल्यात पडलेल्या एका गोणीतून हा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ती गोण नाल्यातून बाहेर काढून पाहिल्यानंतर त्यात मुंडकं नसल्याचा महिलेचा मृतदेह होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी फाॅरेन्सिक टिमच्या मदतीने या गुन्ह्यांचा सखोल तपास करत आहेत. हेही वाचाः कुख्यात गुंड इजाज लकडावालाच्या मुलीला अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा