कुख्यात गुंड इजाज लकडावालाच्या मुलीला अटक

पोलिस दाऊदप्रमाणे आपल्या कुटुंबितील सदस्यांना ही गुन्ह्यात अडकवतील या भितीने त्याने कुटुंबियांसह परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

कुख्यात गुंड इजाज  लकडावालाच्या मुलीला अटक
SHARES

दाऊदप्रमाणे संपूर्ण कुटुंबियांसह परदेशात स्थायिक होण्याचा कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी  हाणून पाडला.  एजाज लकडावालाची मुलगी आपल्या दीड वर्षाच्या मुलासह बोगस पासपोर्टच्या मदतीने  नेपाळमार्गे परदेशात जात असल्याची माहिती मिळाल्यावर  पोलिसांनी तिला विमानतळाहून ताब्यात घेतले.

हेही वाचाः- अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांच्या अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक

मुंबईसह इतर महत्वाच्या शहरात  एजाज विरोधात अनेक खंडणी जिवघेणे हल्ल्यांचे गुन्हे नोंद आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांनी  एजाजच्या टोळीतील सदस्यांची धरपकड केल्यानंतर  एजाजचे मानसिक संतोलन बिघडले होते. त्यातच खार येथील एका गुन्ह्यात  एजाजच्या मुलीचा ही सहभाग होता. पोलिस दाऊदप्रमाणे आपल्या कुटुंबितील सदस्यांना ही गुन्ह्यात अडकवतील या भितीने त्याने कुटुंबियांसह परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने त्याची मुलगी सोनिया मनीषा अडवानी हिला नेपाळमार्गे परदेशात येण्यास सांगितले.  एजाज लकडावाला यांची मुलगी सोनिया मनीषा अडवानी हिचे नाव गुन्ह्यात आल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस बजावली होती. २७ डिसेंबर रोजी सोनिया आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली.

हेही वाचाः- पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांवर मोबाइल चार्जिंग पॉइंट

त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिचा ताबा मिळवला आणि तिला बेड्या ठोकल्या, असे मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शहाजी उमप यांनी सांगितले. अटक केलेली आरोपी सोनिया आडवाणी म्हणजेच एजाजची मुलगी ही बनावट पासपोर्टच्या आधारे देश सोडून परदेशात जाणार होती. पासपोर्ट काढण्यासाठी तिने दिलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिला अटक करून  न्यायालयात हजर केले असता तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा