Advertisement

पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांवर मोबाइल चार्जिंग पॉइंट

पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांवर मोबाइल चार्जिंग पॉइंट
SHARES

पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं पर्यावरणस्नेही स्थानकं उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पश्चिम रेल्वेमार्गावर पर्यावरणपूरक यंत्रणा आणण्यावर ही भर दिला जाणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांत २४ तास विनामूल्य चार्जिंग सेवा उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल चार्जिंग पॉइंटमध्ये एका वेळी ८ फोन चार्जिंग करू शकतो. तर, एका दिवसात १००पेक्षा जास्त फोन चार्ज होऊ शकतात, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चार्जिंग पॉइंट

पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, सांताक्रुझ, अंधेरी, कांदिवली, वसई रोड, नालासोपारा, विरार, बोईसर, पालघर इथं प्रत्येकी १ मशीन बसविण्यात आली आहे. तर, बोरीवली इथं २ मशीन बसविण्यात आल्या आहेत.

यासह आणखी ५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट बसविण्यात येणार आहेत. सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट हे १०० टक्के सौरऊर्जेवर चालणारे असून, त्यासाठी रेल्वे स्थानकाच्या छतावर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत.


हेही वाचा -

वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही- अमृता फडणवीस

प्रवाशांची फसवणूक केली तर रोज रिक्षा फोडणार- नितीन नांदगावकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा