प्रवाशांची फसवणूक केली तर रोज रिक्षा फोडणार- नितीन नांदगावकर

मुंबईत या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. याबाबत शिवसेना नेते नितीन नांदगावकर यानी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

प्रवाशांची फसवणूक केली तर रोज रिक्षा फोडणार- नितीन नांदगावकर
SHARES

रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची फसवणूक झाल्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मुंबईत अशा चालक-मालकांना प्रवाशांकडून चोपही दिला जातो. मात्र, काही महिन्यांपासून मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या प्रवासादरम्यान मिटर प्रचंड वाढल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेक. याआधीही अशाप्रकारच्या घटना समोर आल्या होत्या असून त्या चालकांना त्यावेळी त्यांना समज देण्यात आली होती. मात्र, मुंबईत या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. याबाबत शिवसेना नेते नितीन नांदगावकर यानी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


बेकायदेशीर कृत्य

मीटर वाढवण्यासाठी रिक्षाचालक करीत असलेल्या बेकायदेशीर कृत्याविरोधात शिवसेना नेते नितीन नांदगावकर आक्रमक झाले आहेत. तसंच, मुलुंडमधील चेक नाक्यावरील एका रिक्षाचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्रवाशांची फसवणूक कशाप्रकारे केली जाते हे प्रत्यक्षात दाखवत रिक्षा फोडली आहे. त्याचप्रमाणं प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा दररोज फोडणार असा इशाराही नितीन नांदगावकरांनी दिला आहे.

रिक्षा रोज फोडणार

मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी GST बटण असलेल्या रिक्षा दिसतील. त्या सर्व ठिकाणच्या रिक्षा रोज फोडणार. मुंबईत अशाप्रकारे GST बटण असलेल्या रिक्षा चालू देणार नाही. किती जणांवर गुन्हे दाखल करणार, जनतेची लुटमार थांबणार की नाही?” असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओद्वारे उपस्थित केलाय.

फेसबुक पोस्ट


रिक्षा ….रिक्षा सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील प्रवासातील एक अविभाज्य भाग एक विश्वासाचे नाते पण त्यात आली बेईमानी ती सर्वसामान्य जनतेला लुटण्यासाठी बनवली गेली आणि बघता बघता मुलुंड मधील चेकनाक्यावर सर्रास सर्वच रिक्षा मध्ये आले घोडा मीटर .
सर्व जाती धर्माची लोकं जेंव्हा आपल्याच लोकांना लुबाडायला लागली तर अशा वेळी जनतेने सुद्धा गप्प राहून चालणार नाही. प्रत्येकाने पुढे येऊन विरोध केला पाहिजे .

जवळची भाडी नाकारायचे कारणच ते की लांबच्या भाड्यात घोडा मीटर दाबून हवे तेवढे पैसे उकळायचे बस हाच आमच्या मेहनतीचा धंदा जो बघता बघता सगळ्या मुंबईत फोफावला ….रिक्षा -टॅक्सी सगळेच तरबेज झाले आणि जो तो जनतेला लुबाडायला लागले . कारण जनतेला कधी पडलीच नाही जो तो आपल्या कामात व्यस्त. बस याचाच फायदा ह्या समाजकंटकांनी घेतला आणि मग सगळीकडे दिवसा दिवसाढवळ्या घोडा बटनचा वापर होऊ लागला ….

त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या बटन लपवण्यासाठी केल्या गेल्या .पण हल्लीचे तरबेज रिक्षा वाले बटन वायपरच्या साठी असणारे बटन, लाईटसाठी असणारे बटन, अशा ठिकाणी #GST बटन लावू लागले … माणसे बघून पुड्या बांधायचा धंदा नावारूपाला आला आणि त्यात कधी पकडले गेले की हाता-पाया पडून गरीब चेहरा बनवून तर कधी दादागिरी करून वेळ मारून नेली पण बेईमानीचा धंदा बंद नाही केला हेच सत्य मुंबईत सगळीकडे दिसून येतंय …. आता आपण विचार करू की ह्यावर उपाय काय ? भरपूर आहेत आणि त्यासाठी कायदे आणि यंत्रणा सक्षम कराव्या लागतील पण तरीसुध्दा जेंव्हा प्रवृत्ती विकृती धारण करते तेंव्हा तो कॅन्सर होतो समाजासाठी आणि कॅन्सर ठीक करायचा असतो तेंव्हा त्यावरील उपाय देखील तेवढेच जालीम असतात तरच कॅन्सर मधून बाहेर पडता येते …..
सावधान मुंबईकर …..



हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर

मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा