Advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट


मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट
SHARES

मुंबईतील बदलत्या वातावरणाचा फटका आता मुंबईकरांना बसू लागला आहे. उन, पाऊस, थंडी यामुळं मुंबईकरांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आहे. त्यातच यंदा मुंबईकरांनी वाईट ते अती वाईट हवा अनुभवल्याचं सफर या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीच्या वार्षिक अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे. २०१९ हे वर्ष संपायला एक दिवस राहिला आहे. त्यामुळं सफरच्या पूर्वानुमानानुसार नव्या वर्षाची सुरुवातही मुंबईकरांना वाईट हवेमध्येच करावी लागणार आहे.

आणखी वाईट

मुंबईतील हवा नववर्षात आणखी वाईट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वरळी ते अंधेरी भागामध्ये, बोरिवली पश्चिम, माझगाव या भागांमध्ये पीएम २.५ प्रदूषकांचं प्रमाण अधिक असेल, तर भांडुप इथं हवेची गुणवत्ता चांगली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवेत प्रदूषके

१ जानेवारी रोजी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक घसरून तो २०४ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मुंबईमध्ये ईशान्येकडून वारे वाहणार आहेत. वाऱ्यांचा वेग मंदावलेला असल्यानं हवेत प्रदूषके साचून राहून हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे.

हवेचा दर्जा

मुंबईतील वाहतूककोंडी, बांधकामांमुळं मुंबईतील विविध भागांमध्ये हवेचा दर्जा खालावतो. वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, मालाड इथं अनेकदा हवेचा दर्जा खालावल्याचं समोर आलं आहे. रविवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथील हवेची गुणवत्ता वाईट नोंदली गेली. वर्षभरात मुंबईच्या हवेची गुणवत्ता सहा टक्के दिवस अती वाईट स्वरूपाची होती, तर दहा टक्के दिवस ती वाईट स्वरूपाची होती.हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर

नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा