Advertisement

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार


राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार
SHARES

महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तरासाठी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून मंत्र्यांच्या नावाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसच्या मंत्र्याचीही यादी जाहीर करण्यात आली आहे.

३६ मंत्री शपथ

महाविकास आघाडीचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित झालं आहे. विधानसभेच्या प्रांगणात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शपथविधी सोहळा होणार आहे. ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं शपथविधी सोहळ्याची रविवारी जय्यत तयारी सुरू होती.

भव्य मंडप

विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेतच मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे ५०० ते ७०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये १२ पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मंत्र्याची यादी

शिवसेना : गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, सुनील प्रभू, अनिल परब, शंभुराजे सरप्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटक, रवींद्र वायकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशीष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड.

काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, के. सी. पाडवी, अमिन पटेल.

राष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. किरण लहामटे, आदिती तटकरे.



हेही वाचा -

मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा