LIC ची होम लोन ऑफर, EMI मध्ये ६ महिन्यांसाठी सूट

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ने नवीन गृह कर्जाची ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये गृहकर्ज (home loan) घेणाऱ्या ग्राहकांना ईएमआय (EMI) मध्ये ६ महिन्यांसाठी सूट दिली आहे. म्हणजे ग्राहकांना ६ महिने गृहकर्जाचा ईएमआय द्यावा लागणार नाही.

SHARE

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ने नवीन गृह कर्जाची ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये गृहकर्ज (home loan) घेणाऱ्या ग्राहकांना ईएमआय (EMI) मध्ये ६ महिन्यांसाठी सूट दिली आहे. म्हणजे ग्राहकांना ६ महिने गृहकर्जाचा ईएमआय द्यावा लागणार नाही. 

१५ जानेवारीला एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ने 2020 ची गृहकर्ज (home loan) ऑफर आणली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी एलआयसी (lic) कडून LICHFL ने ही योजना जाहीर केली आहे. कंपनीने Pay When You Stay योजना सुरू केली आहे. तयार होत असलेल्या आणि तयार असलेल्या घरांवर ही योजना लागू असणार आहे. Pay When You Stay योजनेत घर खरेदीदाराला घराचा ताबा मिळाल्यावरच गृहकर्जाची (home loan) मूळ रक्कम भरावी लागेल किंवा पहिल्या डिस्बर्समेंटच्या ४८ महिन्यांनंतर त्यांना मूळ रक्कम भरावी लागेल. यापैकी कोणता पर्याय प्रथम येईल, त्यानुसार खरेदीदाराला पैसे द्यावे लागतील. या कालावधीत, ग्राहकांना केवळ सवलतीच्या रकमेवर (डिस्बर्स्ड अमाउंट)  व्याज द्यावे लागेल.

याशिवाय कंपनीने Ready to move घरांवर ईएमआय (emi) मध्ये ६ महिने सवलत देण्यात आली आहे. या योजनेत दोन ईएमआय कर्जाच्या ५ व्या, १०व्या आणि १५ व्या वर्षी माफ केले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला वेळेवर रिपेमेंट करावं लागेल आणि पहिल्या ५ वर्षापर्यंत कोणतंही प्री-पेमेंट करावं लागणार नाही. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ची ही योजना २९ फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. या योजनेत डिस्बर्समेंट १५ मार्चपूर्वी होईल. 

एलआयसी (lic) च्या या नव्या योजनेत अनेक ग्राहकांना फायदा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गृह (home) खरेदी-विक्री व्यवहारात मंदी आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेक घरं विक्रीविना पडून आहेत. तसंच गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे गृह खरेदीला चालना मिळावी यासाठीच एलआयसीने नवी योजना आणली आहे.

 स्टेट बँक ऑफ इंडियानेही (State Bank of India) या वर्षाच्या सुरूवातीला घर (home) खरेदीदारांसाठी आकर्षक ऑफर (offer) आणल्या आहेत. बँकेने आरबीबीजी (rbbg)  योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एसबीआय (sbi) ग्राहकांना निवडलेले निवासी प्रकल्प पूर्ण करण्याची हमी देईल.हेही वाचा -

रतन टाटांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

PMC Scam : वाधवा पितापुत्राची कोठडी कायम, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

संबंधित विषय
ताज्या बातम्या