Advertisement

पहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस नवी मुंबईत सुरू

नवी मुंबईत बेलापूर (Belapur) येथील कोकण भवन (Konkan Bhavan) मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO Navi Mumabi) सुरू करण्यात आले आहे. विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाल्याची माहिती दिली.

पहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस नवी मुंबईत सुरू
SHARES

जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांनी नुकतीच केली होती. ही घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. नवी मुंबईत बेलापूर (Belapur) येथील कोकण भवन (Konkan Bhavan) मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO Navi Mumabi)  सुरू करण्यात आले आहे. विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाल्याची माहिती दिली. 

 नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, सरकारी पातळीवरील कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवदने, मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात (CMO Navi Mumabi) स्वीकारून त्यावर कार्यवाहीसाठी संबंधीत क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. या कामकाजात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.

उपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार आहेत. तर एक नायब तहसीलदार, एक लिपिक, लिपिक टंकलेखक ही पदे मुख्यमंत्री सचिवालय कक्षात (CMO Navi Mumabi) असतील. या कक्षात नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्ज निवेदनांची पोचपावती संबंधितांना दिली जाणार आहे. ज्या अर्जावर  क्षेत्रीय स्तरावरच कार्यवाही अपेक्षित आहे, असे सर्व अर्ज विभागाच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसंच या कक्षामध्ये येणारे एकूण अर्ज, उचित कार्यवाहीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज इत्यादी सर्व बाबींचा मासिक अहवाल सरकारला देण्यात येणार आहे.

कोकण विभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी बेलापूर  (cbd belapur), नवी मुंबई (navi mumbai) येथे संपर्क साधावा, असं आवाहन विभागीय उपायुक्त(महसूल) सिद्धाराम शालीमठ यांनी केले आहे. 

  •  बेलापूर (Belapur) येथील कोकण भवन (Konkan Bhavan) मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO Navi Mumabi)  सुरू 
  • उपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार आहेत.
  • एक नायब तहसीलदार, एक लिपिक, लिपिक टंकलेखक ही पदे मुख्यमंत्री सचिवालय कक्षात (CMO Navi Mumabi) असतील
  • या कक्षात नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. 
  • कोकण विभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी बेलापूर  (cbd belapur), नवी मुंबई (navi mumbai) येथे संपर्क साधावा.




हेही वाचा -

नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

मुद्याचं बोला- सुप्रिया सुळेंना तरुणीने भरसभेत रोखले

प्रस्ताव देणाऱ्यांची नावे सांगा, शिवसेनेचं चव्हाणांना आव्हान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा