Advertisement

मुद्याचं बोला- सुप्रिया सुळेंना तरुणीने भरसभेत रोखले

CAA आणि NRC विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात घडला प्रकार

मुद्याचं बोला- सुप्रिया सुळेंना तरुणीने भरसभेत रोखले
SHARES

मुंबईतील आग्रीपाडा येथे शुक्रवारी CAA आणि NRC च्या विरोधात महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला मोठया प्रमाणात नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या खासदार (Member of parliament) सुप्रिया सुळे (supriya sule) मार्गदर्शन करत असताना. सभेतील एका तरुणीने सुप्रिया सुळे यांना थांबवत मुद्याचं बोला असे आवाहन केलं.

 राज्यात CAA आणि NRC विरोधात ठिक ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहे. असेच एक आंदोलन ( Protest)  शुक्रवारी आग्रीपाडा (Agripada) येथे आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. राजकिय पुढाऱ्यांनी ही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपस्थिती लावली होती. आंदोलनाला  राञी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करत असताना. जमावातून अचानक एका तरुणीने सुप्रिया यांचे भाषण थांबवत. सुप्रिया यांना मुद्याचं बोलण्याचे आवाहन केलं.


 त्यावेळी सुप्रिया ताईनी मुलीची समजूत काढून उपस्थितांना राज्यात हे दोन्ही कायदे लागू होणार नाही याची शाश्वती सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी भाषण संपल्यानंतर त्या मुलीची भेट घेऊन तिच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा