'या' ४ लोकल सेवेतून बाद

पावसाळ्यात पाणी साचून लोकल बंद पडणं, कोंदट वातावरणामुळं प्रवास करणं असह्य होणं अशी ओळख असलेल्या रेट्रोफिटेड लोकल (Retrofitted local Train) सेवेतून बाद करण्यात आल्या आहेत.

SHARE

मुंबईत पावसाळ्यात जास्तीचा पाऊस (Rain) पडल्यास तिन्ही रेल्वे (Railway Line) मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतं. रेल्वे रुळांवर (Railway Track) पाणी (Water) साचल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. त्यामुळं लोकल विलंबनानं धावत असून यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्याशिवाय, पावसाळ्यात अनेक लोकल (Local) पाणी साचून लोकल बंद पडतात. या अशा लोकलपैकी रेट्रोफिटेड लोकल (Retrofitted local Train) रेल्वे प्रशासनानं सेवेतून आता बाद केल्या आहेत. 

पावसाळ्यात पाणी साचून लोकल बंद पडणं, कोंदट वातावरणामुळं प्रवास करणं असह्य होणं अशी ओळख असलेल्या रेट्रोफिटेड लोकल (Retrofitted local Train) सेवेतून बाद करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या ताफ्यात नवीन तंत्रज्ञानाच्या (New Technology) लोकल सेवेत दाखल झाल्यानं २५ वर्षे पूर्ण झालेल्या ४ लोकल सेवेतून डिसेंबर महिन्यात बाहेर काढण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोनं दान

या रेट्रोफिटेड लोकलमुळं प्रवाशांच्या अनेक तक्रारी (Complaints) येत होत्या. दरम्यान, मध्य रेल्वेच्या (Central Railway) ट्रान्सहार्बर मार्गावर (Trans Harbour) काही रेट्रोफिटेड लोकल आहेत. या लोकलचं आयुर्मान १० वर्षे आहे. त्यामुळं या मार्गावर पुढील नव्या लोकल (New Local) दाखल झाल्यानंतर या लोकल देखील टप्याटप्यानं सेवेतून काढण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनानं दिली आहे.

हेही वाचा - वादग्रस्त मेसेज ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी, १२ हजार मेसेज सोशल मीडियावरून हटवले

पावसाळ्यात रुळांवर पाणी साचल्यानंतर या गाड्या चालवणं अशक्य होतं. परिणामी जुन्या बनावटीच्या रेट्रोफिटेड लोकलमध्ये मोठा बिघाड होतो. हा बिघाड झाल्यास या लोकल कारशेडमध्ये (Car Shades) पुन्हा आणल्या जातात. मात्र, या लोकलची दुरुस्ती करणं कठीण असतं.

हार्बर मार्गावर धावणाऱ्या रेट्रोफिटेड लोकल ह्या डायरेक्ट करंट (डीसी) आधारीत होत्या. हार्बर मार्गावरील विद्युत प्रवाह डीसीतून अल्टरनेट करंट(एसी) केल्यानंतर या रेट्रोफिटेड (Retrofitted local Train) गाड्यांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यामानानं सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून धावू शकतात.हेही वाचा -

मी स्वत: अनुभवलीय मुंबईतली नाईटलाइफ, प्रकाश आंबेडकरांनी दिलं समर्थन

Video: आव्हाडांची जीभ पुन्हा घसरली, काढला 'त्यांचा' बापसंबंधित विषय
ताज्या बातम्या