वादग्रस्त मेसेज ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी, १२ हजार मेसेज सोशल मीडियावरून हटवले

काश्मिरचा कलम ३७०, २०१९ च्या लोकसभा निवडणूका, शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्ष, आयोध्या निर्णय, जेएनयू हिंसाचार या सारख्या घटनांमुळे २०१९मध्ये वादग्रस्त पोस्ट पसरवण्याचे प्रमाण वाढले.

SHARE

मोबाइलवर येणारे (What's app message) प्रक्षोभक मेसेज कुठलीही खात्री न करता पुढे पाठवण्याची अनेकांना सवय असते. अशाच मेसेजमुळे तणाव निर्माण होऊन गैरसमजातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. अशा प्रक्षोभक मेसेजवर करडी नजर ठेवून असलेल्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) ‘सोशल मिडिया लॅब’ने २०१९ मध्ये तब्बल १२, ५३७ पोस्ट हटवल्या आहेत. तर गेल्या दोन वर्षात  पोलिसांनी दहशतवादी विचारसरणीच्या, चिथावणीखोर २८३० पोस्ट डिलिट केल्या आहेत.  

हेही वाचाः- सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोनं दान

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हिंसाचार, दंगल घडवून आणण्यासाठी चिथावणीखोर, प्रक्षोभक वक्तव्य असलेले मेसेज वारंवार पसरवले जातात. या सारख्या घटनांना आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये ‘सोशल मिडिया लॅब’ सुरू केली. या लॅबमध्ये ३० जण कार्यरत असून २४ तास मुंबईतील सोशल मिडियावर लक्ष ठेवून असतात. काही दिवसांपूर्वी जाणीवपूर्वीक मुंबईकरांमध्ये प्रक्षोभक संदेश (Controversial post) पसरवणाऱ्या ३ व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आल्या होत्या. त्या तिघांविरोधात ही पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत.

हेही वाचाः- ‘ये अंधा कानून है’ गाणं, न्यायालयात वाजलेल्या गाण्याने खळबळ

२०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या सोशल मिडिया लॅबने ६२०७ वादग्रस्त पोस्ट हटवल्या, २०१९ मध्ये पोलिसांनी दुपट्टीने म्हणजेच १२, ५३७ वादग्रस्त पोस्ट हटवल्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिस दिवसाला किमान ३७ पोस्ट हटवत आहेत. याचे कारण म्हणजे २०१९मध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. उदा. काश्मिरचा कलम ३७०, २०१९ च्या लोकसभा निवडणूका, शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्ष, आयोध्या निर्णय, जेएनयू हिंसाचार (JNU violence) या सारख्या घटनांमुळे २०१९मध्ये वादग्रस्त पोस्ट पसरवण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे या दोन वर्षात पोलिसांनी २८३० दहशतवादी विचारसरणीच्या पोस्ट हटवल्या आहेत. त्यातील २०१९मधील १३१५ पोस्टचा समावेश आहेत.

हेही वाचाः- बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, वर्षभरात ३४ हजार लायसन्स रद्द

तीन वर्षांपर्यंत शिक्षा

सामूहिक हिंसा किंवा कायदा हातात घेण्याच्या घटना घडण्यास कारणीभूत असणाऱ्या व्यक्ती, तसेच बेजबाबदार संदेश व चित्रफिती समाज माध्यमांमधून प्रसारित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) खाली किंवा अन्य संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यास एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.

हेही वाचा ः- मुंबईत नशेसाठी कप सीरप घेणाऱ्यांमध्ये वाढ

संबंधित विषय
ताज्या बातम्या