८ महिन्यात मुंबई पोलिसांनी ६ हजार वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावरून हटवल्या

मुंबई पोलिसांनी या सहा महिन्यात सोशल मीडियावर ६००० आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या आहेत. या आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक वेगळी लॅब सुरू केली आहे. तिचे नियंत्रण विशेष शाखा (एसबीआय- इटेलिजन्स युनिट) कडून केले जाते.

SHARE

सोशल मिडियाद्वारे वादग्रस्त पोस्ट करून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या फेसबुक, ट्विटर, टिकटाॅक, यू ट्युब, टेलिग्रामवरील ६ हजार पोस्ट मुंबई पोलिसांनी मागील सहा महिन्यात डिलिट केल्या आहेत. सोशल मिडियावरील ही प्रभावी माध्यमं संवाद आणि व्यक्त होण्यासाठी प्रसिद्ध असली तरी त्याद्वारे अनेक गंभीर गुन्हे घडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच अशा डिजिटल माध्यमांवर मुंबईचे सायबर पोलिस सध्या बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.


प्रगत फिल्टर तंत्र

मुंबईत सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी वयाची अट लागत नाही. त्यामुळे अनेक जण सामाजिक भान न ठेवता परिसरातील वातावरण दुषित होण्याइतपत आक्षेपार्ह पोस्ट टाकतात. सोशल मिडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे अनेकदा दोन गटात भांडणे झाल्याचे प्रकार पुढे आले आहेत. समाजामध्ये आजच्या पिढीच्या हातातील ही संपर्काची साधने असली तरी, ती अनेकदा या सोशल मिडियाचा आता चुकीचा वापर होत आहे. त्यामुळेच अशा वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांची खाती बंद करणं, पोस्ट हटवण्याचे काम मुंबई पोलिसांनी हाती घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी या सहा महिन्यात सोशल मीडियावर ६००० आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या आहेत. याआक्षेपार्ह पोस्ट हटवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक वेगळी लॅब सुरू केली आहे. तिचं नियंत्रण विशेष शाखा (एसबीआय- इटेलिजन्स युनिट) कडून केलं जातं. मुंबई पोलिसांकडून वादग्रस्त व तरूणांची माथी भडकवणाऱ्या पोस्ट हटवण्यासाठी प्रगत फिल्टर तंत्र वापरलं जात आहे.


सावधानता बाळगण्याची गरज

गेल्या वर्षी अशा ४८०० आक्षेपार्ह पोस्ट मुंबई पोलिसांनी काढून टाकल्या होत्या. दोन महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्ट्सवर जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहेएखाद्या व्यक्तीचे फेसबुक किंवा ट्व‌िटर अकाऊंट हॅक करून त्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे प्रकारही वारंवार समोर आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या सध्याच्या अनिर्बंध वापराच्या काळात नागरिकांनी अशा आक्षेपार्ह पोस्टविषयी पुरेशी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली असल्याचे पोलिस दलातील वरिष्ठांचं म्हणणं आहे.हेही वाचा -

अल्पवयीन मुलीला आईनेच ढकललं वेश्या व्यवसायात

पोलिस दिदी करणार 'विद्यार्थ्यांचं संरक्षण'
संबंधित विषय
ताज्या बातम्या