अल्पवयीन मुलीला आईनेच ढकललं वेश्या व्यवसायात

तक्रारदार मुलीचे तिच्या आई - वडिलांनी २२ एप्रिल २०१८ रोजी मुलीच्या मनाविरुद्ध राहुल राजा बुधावले यांच्याशी लग्न करून दिले. लग्नानंतर राहुल बुधावलेने मुलीवर वारंवार शारीरीक अत्याचार केले.

अल्पवयीन मुलीला आईनेच ढकललं वेश्या व्यवसायात
SHARES
मुंबईच्या मानखुर्द परिसरात अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देत, कालांतराने तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या मुलीच्या आईसह चौघांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. राहुल राजा बुधावले, आकाश खंडागळे, रवी रमेश जाधव, छाया रमेश जाधव, आशा आकाश खंडागळे अशी या आरोपींची नावं आहेत.

भावाचाही अत्याचार

तक्रारदार मुलीचे तिच्या आई - वडिलांनी २२ एप्रिल २०१८  रोजी मुलीच्या मनाविरुद्ध राहुल राजा बुधावले यांच्याशी लग्न करून दिले. लग्नानंतर राहुल बुधावलेने मुलीवर वारंवार शारीरीक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता राहुल मुलीला कायम मारहाण करायचा.  त्यामुळे अल्पवयीन मुलगी पुन्हा आईच्या घरी आली होती. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशाच पडली. मुलीच्या आईनेच तिला पैशांसाठी परिसरातील आशा खंडागळे हिच्याजवळ देहविक्रीसाठी पाठवले. आशा खंडागळे हिने मुलीला चेंबूर, मुंबई डायमंड गार्डन जवळच्या मॉल जवळच्या परिसरात एका  ५० ते  ६० वर्षाच्या अनोळखी इसमाशी शरीर संबंध  करण्यास भाग पाडले.  या मुलीवर आशा खंडागळे हिचा पती आकाश खंडागळे यानेही घरी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचं तपासात पुढे आलं आहे. तर मुलीच्या भावानेही मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

एक आरोपी फरार

या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात कलम ३७६ (२),(एन)३७७,३२३, ५०६(२) भा.द.वि. सह क. ४,८,१२ POCSO  सह क. ५, ६,१२  PITA सह क. ९,१०,११ बाल विवाह प्रतिबंधक कायदा अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सुर्वे यांनी दिली.हेही वाचा -

स्पाच्या नावाखाली अंधेरीत देहविक्री, विदेशी मुलींचा सहभाग

पोलिस दिदी करणार 'विद्यार्थ्यांचं संरक्षण'
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा