पोलिस दिदी करणार 'विद्यार्थ्यांचं संरक्षण'

अल्पवयीन मुलांना लैंगिक अत्याचाराबाबत फारशी माहिती नसल्याचा फायदा अनेकदा नराधम घेत असल्याचं काही घटनांमधून पुढे आलं आहे. या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही वर्षांपूर्वी पोलिस दीदी हा उपक्रम सुरू केला.

पोलिस दिदी करणार 'विद्यार्थ्यांचं संरक्षण'
SHARES
मुंबईतील शाळेत अथवा परिसरातलील अल्पवयीन मुलींना लैंगिक समज नसल्याचा अनेक नराधम फायदा घेतात. याच नराधमांपासून वाचण्यासाठी २०१६ मध्ये मुंबई पोलिसांनी 'पोलिस दीदी' हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे पोलिस आता थेट पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करून मुलांमध्ये जनजागृती करत आहेत. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी आतापर्यंत तीन टप्यात पालिकांच्या ६२०  मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केलं आहे.


विशेष पथक 

मुंबईत अल्पवयीन मुला-मुलींवर  लैंगिक अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पवयीन मुला-मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत फारशी माहिती नसते. अल्पवयीन मुलांना लैंगिक अत्याचाराबाबत फारशी माहिती नसल्याचा फायदा अनेकदा नराधम घेत असल्याचं काही घटनांमधून पुढे आलं आहे. या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही वर्षांपूर्वी पोलिस दीदी हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात मुंबईतील ९४ पोलिस ठाण्यांमध्ये एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. हे पथक दर आठवड्याला परिसरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना जाऊन लैंगिक अत्याचार आणि संरक्षणाबाबत माहिती दयायचे.


मुख्याध्यापकांना धडे

मात्र शहरातील  कायदा व सुव्यवस्था सांभाळत हजारो शाळांमध्ये जाऊन भेट देणं शक्य नसल्यामुळे पोलिसांनी आता टप्याटप्याने हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. यात पोलिस आता प्रथम पालिकेच्या ११०० शाळांच्या मुख्याध्यापकांना हे धडे देणार असून पुढे मुख्याध्यापक आपल्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे लैंगिक शिक्षण आणि संरक्षणाचे धडे देतील.


खासगी शाळांमध्ये मार्गदर्शन 

 त्यानुसार पोलिसांनी मुंबई शहरातील पालिकांच्या ११०० शाळांपैकी पहिल्या टप्यात २५० शाळांच्या मुख्याध्यापकांना बोलावून कार्यशाळा घेतली. हे मुख्याध्यापक आता त्यांच्या शाळेत ही संकल्पना मांडून जनजागृती करतील. दुसऱ्या टप्यात १९०  शाळांच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. तर सोमवारी या संकल्पनेच्या तिसऱ्या टप्यात १८० शाळांच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यानंतर  मुंबईतील खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना हे मार्गदर्शन करून सर्व शाळांमध्ये पोलिस दीदी अंतर्गत लहान मुलांना लैंगिक व संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.


जवळच्या व्यक्तींकडून शोषण

६० टक्के अल्पवयीन मुलांचे शोषण हे जवळच्याच किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून घडल्याचं पोलिस तपासात आतापर्यंत पुढे आलं आहे. शाळेतील अल्पवयीन मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तींवर ही अल्पवयीन मुले निरागसपणे विश्वास ठेवतात. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे अनेक प्रकरणांतून पुढं आलं आहे. अल्पवयीन मुलांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले.



हेही वाचा -

बारला भेट देणं पडलं महागात, वरिष्ठ पोलिसासह आॅडर्ली निलंबित

स्पाच्या नावाखाली अंधेरीत देहविक्री, विदेशी मुलींचा सहभाग




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा