बारला भेट देणं पडलं महागात, वरिष्ठ पोलिसासह आॅडर्ली निलंबित


बारला भेट देणं पडलं महागात, वरिष्ठ पोलिसासह आॅडर्ली निलंबित
SHARES

पैशांच्या हव्यासातून अंधेरीतील बार अॅण्ड रेस्टाॅरन्टला भेट देणं वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि त्याच्या आॅडर्लीला चांगलंच महागात पडलं आहे. या भेटीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज शर्मा या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशीच्या अहवालानंतर दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


सीसीटीव्हीत रेकाॅर्ड 

अंधेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार यांचा हा बार सुरू होता. या बारला काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक लालासाहेब शेट्ये आणि त्याचा आॅडर्ली मोहम्मद पिरजादे यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी हाॅटेल मालकाशी आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा केली होती. मात्र त्यांचे हे सर्व बोलणं बारमधील सीसीटीव्हीत रेकाॅर्ड झालं होतं. पोलिसांमधील आणि बार मालकांमधील या चर्चेचं स्टिंग आॅपरेशन करण्यात आलं होतं. या घटनेची गंभीर दखल घेऊन तिरिक्त पोलिस आयुक्तांनी दोघांना निलंबीत केलं. ही भेट घडवून आणण्यासाठी शेट्ये यांचा आॅडर्ली पिरजादे यांनी विशेष प्रयत्न केल्याचं समजतं.हेही वाचा -

स्पाच्या नावाखाली अंधेरीत देहविक्री, विदेशी मुलींचा सहभाग

वाहतूक पोलिसांनांच बांबू! बेशिस्त वाहन चालकांनी थकवला ४० लाखांचा दंड
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा